अजितदादांचा अनोखा अंदाज, आधी सायकलची पाहणी, मग दिव्यांगांशी संवाद

अजितदादांचा अनोखा अंदाज, आधी सायकलची पाहणी, मग दिव्यांगांशी संवाद

विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या वार्षिक सभेपूर्वी हा कार्यक्रम पार पडला. (Ajit Pawar Speak with Handicapped)

Namrata Patil

|

Feb 07, 2021 | 11:13 PM

बारामती : कोणतीही नवीन गोष्ट समोर आली की त्याची इत्थंभूत माहिती घ्यायची आणि त्याबद्दल संबंधितांना सूचना करायच्या ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खासियत. नियमांचं पालन व्हायला हवं यासाठी अजितदादा नेहमीच आग्रही असतात. आजही अजितदादांचा एक आगळावेगळा स्वभाव बारामतीकरांनी अनुभवला. बारामतीत दिव्यांगांसाठी बॅटरीवर चालणाऱ्या तीनचाकी सायकल वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अजित पवारांनी तब्बल 20 ते 25 मिनिटे उपस्थित दिव्यांगांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना देण्यात येणारी बॅटरीची सायकल चालवण्याबाबत सूचनाही केल्या. एवढंच नव्हे तर संबंधितांना सायकलची राईड घ्यायला लावत अजितदादांनी आपला वेगळा ‘अंदाज’ दाखवून दिला. (Ajit Pawar Distribute three wheeled bicycles to Handicapped)

केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेअंतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघातील दिव्यांगांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज दिव्यांगांना बॅटरीवर चालणाऱ्या तीनचाकी सायकलचं वाटप करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या वार्षिक सभेपूर्वी हा कार्यक्रम पार पडला.

अजित पवार हे अर्धा तासाआधीच विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल परिसरात पोहोचले. या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा दिव्यांगांच्या तीनचाकी सायकलींकडे वळवला. यानंतर त्यांनी उपस्थित असलेल्या प्रत्येक लाभार्थ्याकडे जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच त्यांची कौटुंबिक परिस्थिती, व्यवसाय अशी सर्व माहिती घेतली.

त्याशिवाय उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून या सायकलबद्दल माहिती घेतली. संबंधित लाभार्थ्यांना सायकल चालवण्याचं प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही केल्या. एवढ्यावरच न थांबता रस्त्याच्या डाव्या बाजूने आपली सायकल कमीत कमी वेगात चालवा, असेही अजित पवारांनी सांगितले. सायकलचे ब्रेक, ग्रीप अशा सर्व बाबी दाखवून दिल्या. त्यानंतर अजितदादांनी लाभार्थ्यांना सायकलची राईड घेण्याबद्दल सांगत स्वतः त्यांना मार्गदर्शन केलं. स्वतःची काळजी घेत सायकल चालवा, नियमांचं पालन करा, असं सांगायला ते विसरले नाहीत.

दरम्यान एरवी एखाद्या कार्यक्रमात नेते उपस्थिती लावतात आणि निघून जातात. मात्र प्रत्येक गोष्टीची सखोल माहिती घेण्याचं अजितदादांना नेहमीच कुतूहल असतं. आजही त्यांनी बॅटरीवर चालणाऱ्या तीनचाकी सायकलींबद्दल माहिती घेतली. एवढ्यावरच न थांबता संबंधित लाभार्थ्यांना राईड घेण्यास सांगत आपलं वेगळेपण दाखवून दिलं. अजितदादा म्हणजे कडक स्वभावाचे नेते असं म्हटलं जातं. मात्र प्रत्यक्षात या दिव्यांग लाभार्थ्यांनी अनोख्या अजितदादांना अनुभवलं. त्यामुळेच त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान पाहायला मिळत होतं. (Ajit Pawar Distribute three wheeled bicycles to Handicapped)

संबंधित बातम्या : 

वाडियात गर्भातील 50 टक्के बाळांना हृदयरोगांची लागण; नवजात बालकांमधील हृदयदोष वाढला

… तर मंत्रालयात घुसून मंत्र्यांचे कपडे काढणार, छावा संघटनेच्या जावळेंचा ठाकरे सरकारला इशारा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें