AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात कोणत्या रंगाचे कपडे घालावे? शरीराला थंडावा देण्यासाठी बेस्ट पर्याय कोणते?

उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी केवळ योग्य आहारच नाही, तर कपड्यांच्या रंगाची निवडही महत्त्वाची ठरते. कोणते रंग उष्णता शोषतात आणि कोणते परावर्तित करतात, याची शास्त्रोक्त माहिती आणि उन्हाळ्यासाठी उपयुक्त फॅशन टिप्स या लेखात पहा.

उन्हाळ्यात कोणत्या रंगाचे कपडे घालावे? शरीराला थंडावा देण्यासाठी बेस्ट पर्याय कोणते?
Summer Fashion Tips
| Updated on: Mar 08, 2026 | 2:23 PM
Share

होळी झाल्यानंतर सर्वत्रच उकाडा वाढत चालला आहे. उन्हाळा सुरू झाला की घामामुळे आणि वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होते. अशावेळी आपण काय खातो आणि पितो यासोबतच आपण कोणत्या रंगाचे कपडे घालतो, यालाही मोठे महत्त्व असते. विज्ञानानुसार, काही विशिष्ट रंग उष्णता शोषून घेतात. तर काही रंग ते परावर्तित (Reflect) करतात. उन्हाळ्याचा त्रास कमी करण्यासाठी कपड्यांच्या रंगांची निवड कशी असावी, याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेऊया.

१. पांढरा रंग

उन्हाळ्यात पांढरा रंग हा सर्वात थंड मानला जातो. पांढरा रंग सूर्यप्रकाश आणि उष्णता शोषून घेण्याऐवजी ती परावर्तित करतो. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच जास्त घाम येत नाही.

२. फिकट गुलाबी आणि बेबी पिंक

गडद रंगांच्या तुलनेत फिकट गुलाबी रंग डोळ्यांना तर शांतता देतो. त्यासोबतच शरीरालाही गारवा देतो. हा रंग उष्णता कमी शोषून घेत असल्याने उन्हाळ्यात बाहेर पडताना हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

३. आकाशी किंवा फिकट निळा

निळा रंग हा निसर्गतः शीतलतेचे प्रतीक मानला जातो. उन्हाळ्यात गडद निळ्या ऐवजी ‘स्काय ब्लू’ किंवा ‘पावडर ब्लू’ रंगाचे सुती कपडे घातल्यास उन्हाचा चटका कमी जाणवतो.

४. पिवळा आणि लिंबू पिवळा

पिवळा हा ऊर्जेचा रंग असला तरी, उन्हाळ्यात त्याचे फिकट शेड्स अत्यंत प्रभावी ठरतात. लिंबू पिवळा रंग प्रकाशाला परावर्तित करतो, ज्यामुळे शरीराला उष्णतेपासून संरक्षण मिळते.

५. मिंट ग्रीन किंवा फिकट हिरवा

निसर्गाच्या जवळ जाणारा हा रंग उन्हाळ्यात मनाला आणि शरीराला प्रसन्न ठेवतो. मिंट ग्रीन रंगाचे कपडे घातल्याने उष्णतेचा दाह कमी जाणवतो.

कोणती काळजी घ्यावी?

उन्हाळ्यात काळा, गडद निळा किंवा गडद जांभळा रंग टाळावा. हे रंग उष्णता शोषून घेतात, ज्यामुळे अधिक घाम येतो आणि अस्वस्थता वाढते. केवळ रंगच नाही, तर कापडही महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात सुती (Cotton) किंवा लिनेन (Linen) कापडाचेच कपडे वापरावेत, कारण ते घाम शोषून घेतात आणि त्वचेला हवा खेळती ठेवतात. उन्हाळ्यात घट्ट कपड्यांऐवजी थोडे सैल कपडे घालण्याला प्राधान्य द्यावे.

दरम्यान उन्हाळ्यात केवळ फॅशन म्हणून नव्हे, तर विज्ञानाचा विचार करून निवडलेले हलके रंग आणि सुती कापड आपल्याला उन्हाच्या तीव्रतेपासून वाचवू शकतात. बाहेरील उष्णतेचा सामना करण्यासाठी शरीराला आतून हायड्रेटेड ठेवण्यासोबतच योग्य कपड्यांची निवड केल्यास, उन्हाळा अगदी सुखद होऊ शकतो. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात स्वतःला फिट आणि कूल ठेवण्यासाठी आपल्या वॉर्डरोबमध्ये या समर फ्रेंडली रंगांचा समावेश नक्की करावा.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!