AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! आंतरराष्ट्रीय बाजारातून गुडन्यूज, थेट भारतात होऊ शकतात पेट्रोल-डिझेलचे भाव कमी, तब्बल..

इराण आणि अमेरिका युद्धात महागाई वाढताना दिसली. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या दरात वाढ झाली. आता हे युद्ध थांबले असून जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत आहेत. भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! आंतरराष्ट्रीय बाजारातून गुडन्यूज, थेट भारतात होऊ शकतात पेट्रोल-डिझेलचे भाव कमी, तब्बल..
Petrol and Diesel Prices
| Updated on: Jun 17, 2026 | 8:08 AM
Share

3 महिन्याच्या मोठ्या कालावधीनंतर अखेर इराण आणि अमेरिका युद्ध थांबले. दोन्ही देशात युद्धविराम शांतता करार झाला. इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाचे भाव गगणाला पोहोचले होते. होर्मुज खाडी बंद असल्याने पुरवठा साखळी विस्कळीत झाली. इराण आणि अमेरिका युद्धानंतर आता होर्मुज खाडी सुरू आहे. अमेरिकेनेही तटबंदी काढली. या युद्धादरम्यान जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या होत्या. आता कच्च्या तेलाच्या किमती घसरताना दिसत आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाच्या किमती इतक्या जास्त वाढल्या होत्या की, भारतात तीन महिन्यात चार वेळा पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीच्या गॅसच्या दरात वाढ करण्यात आली होती. तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाची किमत 77 डॉलर प्रति बॅरल गेली. 16 टक्क्यांनी या किमती कमी झाल्या आहेत. शुक्रवारी इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम शांतता करारावर सह्या होणार आहेत.

त्यापूर्वी त्यांनी युद्धविरामाची घोषणा केली. 14 अटींवर युद्धविराम करार झाले. विशेष म्हणजे इराणला जागतिक बाजारात आपले तेल निर्यात करण्याची संधी पुन्हा एकदा मिळाली. अमेरिकेने इराणच्या तेलावर जागतिक बाजारात बंदी घातली होती. अखेर इराणच्या तेलावरील बंदीही या करारातून उठली आहे. इराणचे तेल बाजारात दाखल झाल्यावर सर्वात जास्त फायदा भारताचा आहे. कारण इराण आणि भारत यांच्यातील व्यवहार हा डॉलरमध्ये नाही तर रूपयांमध्ये होतो.

इराणचे तेल जागतिक बाजारात दाखल झाल्यानंतर अजून कच्च्या तेलाच्या किमती घसरण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरत असताना भारतात देखील आता पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी होऊ शकतात. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना सरकारने पेट्रोलच्या किमतीत वाढ केली होती. आता या किमती कमी होण्याचा अंदाज आहे.

होर्मुज खाडी बंद असताना सरकारकडून सातत्याने मोठे निर्णय घेतले जात होते. त्यामध्येच आता पुन्हा एकदा किमती कमी होत आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात भारतात महागाई वाढली होती. प्रत्येक गोष्टीचे भाव वाढत होते. अखेर युद्ध थांबल्याने मोठा दिलासा मिळाला. काही देशात तर लॉकडाऊनची स्थिती होती.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात