AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साबणाचे उरलेले तुकडे फेकून देताय? थांबा! वाचू शकतात तुमचे हजारो रुपये

घरामध्ये उरलेले साबणाचे छोटे तुकडे फेकून देण्याऐवजी त्यांचा कल्पक वापर कसा करायचा, हे या लेखात शिका. कपाटातील दुर्गंधी घालवण्यापासून ते घरगुती हँडवॉश बनवण्यापर्यंतच्या भन्नाट टिप्समुळे तुमची पैशांची बचत होईल.

| Updated on: Mar 08, 2026 | 1:46 PM
Share
आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आंघोळीचा किंवा हात धुण्याचा साबण वापरता वापरता शेवटी त्याचे छोटे तुकडे उरतात. अनेकदा हे तुकडे हातात पकडणे कठीण होते, म्हणून मग आपण ते कचऱ्यात फेकून देतो.

आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आंघोळीचा किंवा हात धुण्याचा साबण वापरता वापरता शेवटी त्याचे छोटे तुकडे उरतात. अनेकदा हे तुकडे हातात पकडणे कठीण होते, म्हणून मग आपण ते कचऱ्यात फेकून देतो.

1 / 8
मात्र, हे छोटे तुकडे फेकून न देता आपण त्याचा वापर करून घरातील अनेक कामे सोपी करू शकता. या उरलेल्या साबणाचा वापर तुम्ही घरातील स्वच्छतेपासून ते दुर्गंधी दूर करण्यासाठी नक्की करु शकता.

मात्र, हे छोटे तुकडे फेकून न देता आपण त्याचा वापर करून घरातील अनेक कामे सोपी करू शकता. या उरलेल्या साबणाचा वापर तुम्ही घरातील स्वच्छतेपासून ते दुर्गंधी दूर करण्यासाठी नक्की करु शकता.

2 / 8
पावसाळ्यात किंवा दमट हवेमुळे कपाटातील कपड्यांना अनेकदा कुबट वास येतो. अशा वेळी साबणाचे उरलेले छोटे तुकडे नीट वाळवून एका पातळ सुती कापडात किंवा जाळीच्या पिशवीत बांधून ठेवा. ही पुरचुंडी कपाटात किंवा ड्रॉवरमध्ये ठेवल्यास कपडे दीर्घकाळ ताजे आणि सुगंधी राहतात.

3 / 8
उन्हाळ्यात घामामुळे किंवा पावसाळ्यात ओलाव्यामुळे बुटांना घाण वास येण्याची समस्या निर्माण होते. ही दुर्गंधी दूर करण्यासाठी रात्री झोपताना साबणाचे छोटे तुकडे बुटांमध्ये ठेवा. यामुळे बुटांमधील ओलावा शोषला जातो आणि सकाळी तुमचे बूट फ्रेश वाटतील.

4 / 8
उरलेले साबणाच्या तुकड्यांचा वापर करुन तुम्ही एक लिक्विड सोप तयार करु शकता.  यासाठी उरलेले साबणाचे तुकडे किसून घ्या. एका भांड्यात पाणी गरम करून त्यात हे कीस विरघळवा. हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात आवडीचे सुगंधी तेल मिसळून एका बाटलीत भरा. तुमचा घरगुती लिक्विड हँडवॉश तयार होईल.

5 / 8
जर तुम्ही घरी कपडे शिवत असाल, तर कापडावर खुणा करण्यासाठी महागड्या टेलरिंग चॉक ऐवजी वाळलेल्या साबणाच्या तुकड्याचा वापर करा. साबणाचे हे डाग धुण्यानंतर सहज निघून जातात आणि पैसेही वाचतात.

जर तुम्ही घरी कपडे शिवत असाल, तर कापडावर खुणा करण्यासाठी महागड्या टेलरिंग चॉक ऐवजी वाळलेल्या साबणाच्या तुकड्याचा वापर करा. साबणाचे हे डाग धुण्यानंतर सहज निघून जातात आणि पैसेही वाचतात.

6 / 8
बाथरूममध्ये ओलावा जास्त असल्याने अनेकदा तिथे दुर्गंधी येते. साबणाचे छोटे तुकडे एका जाळीच्या पिशवीत भरून बाथरूमच्या कोपऱ्यात लटकवा. पाण्याच्या वाफेमुळे साबणाचा सुगंध हवेत दरवळत राहील आणि बाथरूम ताजेतवाने वाटेल.

7 / 8
अनेकदा जुन्या कपाटाचे दरवाजे उघडताना-मिटताना आवाज येतो किंवा खिडक्यांच्या स्लायडिंग पट्ट्या जाम होतात. अशा वेळी साबणाचा छोटा सुका तुकडा त्या बिजागरीवर किंवा चॅनेलवर घासल्याने घर्षण कमी होते. त्यानंतर दरवाजे आणि खिडक्या अगदी सहजपणे आणि विनाआवाज उघडल्या जातात.

8 / 8
Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम