AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्याला सोडून का नाही दिलं? 15 वर्ष नवऱ्याकडून मारझोड, अपमानित करणारे शब्द आणि…, अभिनेत्रीचा भयानक खुलासा

अभिनेत्रींचं आयुष्य दिसतं तेवढं सोपं नसतं... 15 वर्ष नवऱ्याचा त्रास सहन केल्यानंतर अभिनेत्रीचा भयानक खुलासा... नवऱ्याकडून सतत मारझोड... अपमानिक करणारे शब्द आणि... धक्कादायक आहे सत्य...

त्याला सोडून का नाही दिलं? 15 वर्ष नवऱ्याकडून मारझोड, अपमानित करणारे शब्द आणि..., अभिनेत्रीचा भयानक खुलासा
Celina Jaitly
| Updated on: Mar 08, 2026 | 9:56 AM
Share

माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री सेलिना जेटली हिने पती पीटर हाग याच्या विरोधात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात घरगुती हिंसा, क्रुरता यांसारखे गंभीर आरोप केले होते. एवढंच नाही, लग्नानंतर 15 वर्ष अभिनेत्रीच्या नवऱ्याने तिची मारझोड केली आणि तिला सतत अपमानित केलं… आता सेलिना हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने अशा प्रश्नाचं उत्तर दिलं आहे, जे कायम एका पीडितेला विचारलं जातं…. तू त्याला सोडून का दिलं नाही? यावर सेलिना म्हणते, जेवढं लोकांना माहिती असतं, सत्य त्यापेक्षी कितीतरी पटीने कठीण असतं…

सेलिना एक फोटो पोस्ट करत म्हणाली, ‘त्याला सोडून का देत नाही? या प्रश्नाचं उत्तर सतत देत असताना पीडित महिला पूर्णपणे थकते… यशस्वी आणि उच्च शिक्षित लोकं 15 वर्ष अशा अपमानास्पद नात्यात कसे राहू शकतात. मी देखील स्वतःला हाच एक प्रश्न विचारला का? पहिल्यांदा घटना घडली तेव्हा मी बाजूला का नाही झाली… सतत होत असताना सुद्धा नाही… मी तेव्हा आंधळी झालेली का? अशक्त झालेली का? की मला या परिस्थितीची सवय झालेली? पण लोकांना जे सत्य माहिती असतं, त्यापेक्षी कितीतरी कठीण परिस्थिती असते… याची सुरुवात पूर्णपणे हिंसेने कधीच होत नाही… सुरुवात प्रेमाने आणि वचनांनी होते… ते परस्परावलंबनामुळे असतं. तुम्हाला असं वाटते की तुम्ही तुमचं भविष्य स्वतः घडवत आहात आणि तेव्हाच काहीतरी बदल होतो. ‘

‘पण अत्याचार कधीच सतत होत नसतो. कधी-कधी चांगले दिवस देखील येतात. क्षमा मागितली जाते… रडणं होतंय… बदल नेहमीच योग्य वाटतो. आशा असते. आशा व्यसनाधीन होते आणि लोक आशेच्या अगदी लहानातल्या लहान संधी शोधू लागतात. मानसिक आणि शारीरिक छळामुळे व्यक्ती अस्वस्थ होतो. सुरुवातीला, तुम्ही शांतपणे जुळवून घेता. नंतर तुम्ही थोडे अधिक सहन करता. नंतर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारता. पहिल्यांदा, तुम्ही स्तब्ध असता. पाचव्या वेळी, तुम्ही गोंधळलेले असता. आणि दहाव्या वेळी, सर्वकाही सामान्य होते.

‘त्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यात मुलांना आणता… मला तर 4 सुंदर मुलं आहेत… तुम्ही मुलांसाठी सर्वकाही करण्यासाठी तयार होता… एवढंच नाही तर, तुमचं स्वतंत्र देखील खोलीत बंद होतं… तुमचं यश तुम्हाला वास्तवातून बाहेर काढत नाही, पदव्या तुमच्या आयुष्यात जळणारी ठिणगी विझवत नाहीत. जनतेची ताकद आणि पाठिंबा देखील एकाकीपणाच्या भीतीला झाकू शकत नाही. तुम्हाला वाटतं की तुम्ही सगळं ठीक करू शकता, पण त्या भ्रमात तुम्ही त्याग करत राहता. मग, तुमच्या आयुष्यात धोकादायक बनलेली ओळखीची व्यक्ती अनोळखी व्यक्तीपेक्षा चांगली वाटते.’

पुढे अभिनेत्री म्हणते, ‘छळ फक्त शारीरिक नसतो… कधीकधी एकांतात देखील होतो… स्वतःवर असलेला विश्वास कमी होऊ लागतो… उलट, कधीकधी ताकद शक्य तितका काळ टिकून राहण्यात असते…’, असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या सेलिना हिची पोस्ट सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी