शिवप्रेमींचा उद्रेक झाला तर महाराष्ट्रात फार वाईट घडेल, या नेत्याने भाजपसह राज्य सरकारला दिला इशारा

| Updated on: Dec 01, 2022 | 5:12 PM

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी भाजपकडून ठरवून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणे हाच त्यांचा अजेंडा.

शिवप्रेमींचा उद्रेक झाला तर महाराष्ट्रात फार वाईट घडेल, या नेत्याने भाजपसह राज्य सरकारला दिला इशारा
Follow us on

मुंबईः महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून सत्तांतर घडवून आणल्यानंतर राज्यात ठाकरे गट अनेक अंगाने राजकारणात सक्रिय झाला आहे. उद्धव ठाकरे यांनीही विविध भागात दौरे, जिल्हा प्रमुखांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यातच माजी मुख्यमंत्र्यांनी काल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज्यात पहिली महिला मुख्यमंत्री बसवण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या त्या मतावर शिवसैनिकांनीही त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

याबाबत बोलताना कोल्हापूरचे शिवसेनेचे नेते संजय पवार यांनी सांगितले की, पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे जे निर्णय घेतात ते शिवसेनेसह राज्याच्या हिताचेच निर्णय घेतात.

त्यामुळे महिला मुख्यमंत्री करण्याचा निर्णय त्यांनी जो घेतला आहे तो नक्कीच स्वागतार्ह असल्याचेही त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीगाठी नंतर भीमशक्ती-शिवशक्ती एकत्र येण्याचे संकेत दिले जात आहेत.

त्यामुळे त्याविषयीही बोलताना त्यांनी सांगितले की, राज्याच्या आणि पक्षाच्या हितासाठी जर कोणी हात पुढे करत असेल तर त्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य तोच निर्णय घेतील असंही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानजनक वक्तव्य केली जात आहेत.

त्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी भाजपकडून ठरवून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणे हाच त्यांचा अजेंडा असल्याची टीकाही त्यांच्यावर करण्यात आली.

यावेळी त्यांनी ज्या भाजपच्या नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यांची त्यांनी यादीच सांगितली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी आणि आता मंगल प्रभात लोढा यांच्याकडून शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेली त्यांची वक्तव्य ही ठरवून केली जात आहेत.

त्यामुळे आम्ही आता कोल्हापूरात अशा नेत्यांवर गुन्हा नोंद करण्याचा विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सातत्याने अपमानजनक आणि वादग्रस्त विधानं भाजपकडून केली जात आहेत. त्यामुळे एकदा का शिवप्रेमींचा महाराष्ट्रात उद्रेक झाला तर फार वाईट राज्यात घडेल असा इशाराही त्यांनी भाजपला दिला आहे.