Dog Attack : या शहरात मोकाट कुत्र्याचा हौदोस, 198 जणांना फोडून काढले, नागरिक चिंतेत

| Updated on: Jan 17, 2023 | 11:26 AM

या शहरात लोकं घरातून बाहेर पडायला घाबरतात, मोकाट कुत्र्यांनी 198 जणांना फोडून काढले, नागरिकांच्या मागणीला न्याय कोण देणार ?

Dog Attack : या शहरात मोकाट कुत्र्याचा हौदोस, 198 जणांना फोडून काढले, नागरिक चिंतेत
Dhule dog attack
Image Credit source: tv9marathi
Follow us on

धुळे – शहरात (Dhule city) 45 दिवसात 198 जणांना मोकाट कुत्र्याने (Dog Attack) फोडून काढल्याची बाब समोर आली आहे. रविवारी मोहाडी भागात आठ ते दहा बालकांना कुत्र्यांनी चावा घेतला. दररोज सरासरी चार ते पाच नागरिकांना कुत्री फोडून काढत असल्याच्या घटना घडत आहेत. 45 दिवसापूर्वीच महापालिकेच्यावतीने (DMC) खाजगी कंपनीला कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र अद्याप ते काम सुरू झालेले नाही. त्यामुळे कुत्र्यांची बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

धुळे शहरातील सर्वच भागांमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. अनेक वेळा हे कुत्रे रात्रीवेळी घरी जाणाऱ्या नागरिकांवर हल्ले करतात. तीन दिवसापूर्वी मोहाडीत आठ ते दहा बालकांवर कुत्र्याने हल्ला केला. त्यामुळे मोकाट कुत्र्याचा प्रश्न पुन्हा गंभीर झाला आहे. यापूर्वी महापालिका सभागृह सत्ताधारी नगरसेवकांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती. मात्र तरी देखील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होऊ शकला नाही.

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे महापालिकेच्यावतीने खासगी कंपनीला कुत्र्यांना ताब्यात घेण्याचे कॉन्ट्रॅ्क्ट दिले, त्याला जवळपास दीड महिना उलटला आहे. मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी वारंवार आता नागरिकांच्या वतीने होत आहे.