Dhule: 116 वर्षाच्या इतिहासात पहिल्यादा पोलीस भरती चर्चेत, तृतीयपंथी उमेदवाराच्या अर्जामुळे पोलिस…

| Updated on: Jan 05, 2023 | 2:38 PM

पदवीधर तृतीयपंथीचा पोलिस भरतीसाठी अर्ज, शासनाच्या निर्णयाकडे खात्याचं लक्ष

Dhule: 116 वर्षाच्या इतिहासात पहिल्यादा पोलीस भरती चर्चेत, तृतीयपंथी उमेदवाराच्या अर्जामुळे पोलिस...
शासनाच्या निर्णयाकडे खात्याचं लक्ष
Image Credit source: twitter
Follow us on

धुळे : धुळे (Dhule) जिल्ह्यात सध्या पोलिस भरतीची (Police Recruitment) प्रक्रिया सुरु आहे. 116 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलीस भरती चर्चेत आली आहे. एका तृतीयपंथीने (Transgender) पोलिस भरतीसाठी अर्ज दाखल केल्यामुळे पोलिस खात्यासह सगळीकडे चर्चा आहे. आज चाचणीचा एक भाग म्हणून उमेदवारांची कवायत घेण्यात आली. राज्य शासनाकडून अद्याप तृतीयपंथी चांदच्याबाबत कसल्याची प्रकारची स्पष्ट आदेश आले नसल्याने प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करुन घेतल्या जात आहेत. शासनाच्या पुढील आदेशानुसार चांद तडवी यांच्याबाबत निर्णय घेण्यात येईल असं पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी स्पष्ट केलं आहे.

चांद तडवी यांचा मैदानातील उत्साह वाढवण्यासाठी धुळे शहरातील अन्य तृतीयपंथी देखील मैदानाबाहेर उपस्थित होते. पोलीस भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांना स्थान देण्याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत यावेळेस उपस्थित तृतीयपंथीनी केले.

चांद तडवी या सध्या टी. वाय. बी. कॉम चे शिक्षण घेत आहे. त्यामुळे तिच्या निवडीबाबत आता संपुर्ण शहरभर उत्सुकता दिसून येत आहे. शासनाच्या निर्णयाचं चांद तडवी यांनी स्वागत केलं आहे. त्याचबरोबर दुर्लक्षित असलेल्या घटकावर शासनाने लक्ष दिल्याने त्याचे आभार मानले आहेत. या परीक्षेत नक्की पास होऊ हे देखील चांद तडवी यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

नेहमी वंचित राहिलेल्या घटकाला राज्य सरकारने सामावून घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्य सरकारचं सर्वत्र कौतुक होतं आहे.