Ahmednagar : कृषी विद्यापीठातील विद्यार्थी गटात वाद, प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर निवळले वातावरण

| Updated on: Aug 01, 2022 | 10:46 AM

रविवारी पहाटे अचानक वसतीगृहातील विद्यार्थ्यांवर येथील स्थानिक विद्यार्थ्यांनी दगडफेक करण्यास सुरवात केली. रविवारची पहाट असल्याने अंधारात वसतीगृहाच्या दिशेने दगडे भिरकावली जात होती. यामध्ये काही विद्यार्थी हे जखमी झाले पण ज्यांना या वादाबद्दल काहीच माहिती नव्हते ते मात्र, दबा धरुन बसले होते.

Ahmednagar : कृषी विद्यापीठातील विद्यार्थी गटात वाद, प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर निवळले वातावरण
महात्मा फुले कृषी विद्यापठीत विद्यार्थ्यांच्या दोन गटात वाद झाला. त्यावेळी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना अशा प्रकारे एकत्र बसवण्यात आले होते.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

अहमदनगर : महाविद्यालय म्हणले की (The two groups) दोन गट आणि वाद हे आलेच. पण (Mahatma Phule Agricultural University) महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे नेमक्या कोणत्या कारणावरुन दोन (Student) विद्यार्थी गटामध्ये वाद झाला याचे कारण अद्यापही समोर आले नाही. मात्र, स्थानिक विद्यार्थी आणि शिक्षणासाठी परगावाहून आलेल्या विद्यार्थ्यामधील वाद अगदी टोकाला गेला होता. येथील विद्यार्थ्यांना वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर दगडफेक केली होती. त्यामुळे विद्यापीठ परिसरातील वातावरण टाईट झाले होते. शिवाय हा प्रकार रविवारी पहाटे झाल्याने भांडण सोडवण्यासही कोणी नव्हते. अखेर विद्यापीठातील सुरक्षा रक्षक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करुन परगावच्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात बसवले तर येथील स्थानिक विद्यार्थ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यामुळे वातावरण शांत झाले होते.

विद्यार्थ्यांमध्ये घबराहट, अनेकजण बसले दबा धरुन

रविवारी पहाटे अचानक वसतीगृहातील विद्यार्थ्यांवर येथील स्थानिक विद्यार्थ्यांनी दगडफेक करण्यास सुरवात केली. रविवारची पहाट असल्याने अंधारात वसतीगृहाच्या दिशेने दगडे भिरकावली जात होती. यामध्ये काही विद्यार्थी हे जखमी झाले पण ज्यांना या वादाबद्दल काहीच माहिती नव्हते ते मात्र, दबा धरुन बसले होते. वसतीगृहात अधिकृतपणे राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर नेमका कशाचा राग होता हे स्पष्ट झाले नसले तरी वादा दरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. महात्मा फुले विद्यापीठात ही घटना घडली आहे.

वसतीगृहाच्या पायऱ्यांवर विद्यार्थ्यांकडून गराडा

वसतीगृहाच्या परिसरात वादाला सुरवात झाली होती. मात्र, सुरक्षा-रक्षक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आतमध्ये आणले व मुख्य गेट हे बंद करुन घेतले. असे असतानाही स्थानिकच्या विद्यार्थ्यांनी मात्र, वसतीगृहाला गराडा घातला. एवढेच नाहीतर वसतीगृहातील विद्यार्थ्यांना बाहेर येण्याचे ते आव्हान देत होते. मात्र, सुरक्षा रक्षक आणि काही प्रशासकीय अधिकारी यांनी त्यांची समजूत काढली वर प्रकरण अधिकचे चिघळले नाही.

प्रशासनाचा हस्तक्षेप आला कामी

भल्या पहाटेच विद्यार्थ्यांमध्ये वाद निर्माण झाल्याने वातावरण टाईट झाले होते. मोजक्या विद्यार्थ्यांमधील वादाच नाहक त्रास इकरांनाही झाला तर अनेकजण आडोशाला दबा धरुन बसले होते. अखेर सुरक्षा रक्षक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ठाण मांडून बसल्याने वाद अधिक चिघळला नाही. अन्यथा संतप्त विद्यार्थांनी टोकाची भूमिका घेतली असती.