AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded : पावसाची उसंत, पंचनाम्याला सुरवात, विरोधी पक्षनेत्याच्या दौऱ्याचा परिणाम की मुख्यमंत्र्यांच्या सूचना..!

हंगामाच्या सुरवातील पावसाअभावी याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली होती. असे असूनही खरीप हंगाम हा अडचणीत होता. मात्र, 1 जुलै रोजी सुरु झालेला पाऊस हा पिके आणि शेतकऱ्यांचे परिश्रम पाण्यात घालूनच गेला. सलग 15 दिवस पावसामध्ये सातत्य राहिले होते. त्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचे तर नुकसान झालेच पण शेत जमिनही खरडून गेली होती.

Nanded : पावसाची उसंत, पंचनाम्याला सुरवात, विरोधी पक्षनेत्याच्या दौऱ्याचा परिणाम की मुख्यमंत्र्यांच्या सूचना..!
नांदेड जिल्ह्यामध्ये अखेर पंचनाम्यास सुरवात झाली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Aug 01, 2022 | 10:08 AM
Share

नांदेड : केवळ मराठवाड्यातच नव्हे तर राज्यात पावसाचा सर्वाधिक फटका नांदेडकरांना बसलेला आहे. दरवर्षी नांदेड जिल्ह्यावर वरुणराजाची कृपादृष्टी ही असतेच पण यंदा अपेक्षेपेक्षा जास्त झाल्याने पेरणी झालेली (Crop Damage) पिके तब्बल 15 दिवस पाण्यात होती. शिवाय राज्यात पावसाने उघडीप दिली पण नांदेडात रिमझिम ही सुरुच होती. गेल्या चार दिवसांपासून चित्र बदलत आहे. पावसानेही उसंत घेतली तर आता (Panchanama) पंचनामेही वेगात होऊ लागले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा पीक पाहणीचा दौरा संपताच प्रशासकीय यंत्रणा हालली असून पंचनाम्याला सुरवात झाली अशी कुजबूज आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री यांनी सूचना दिल्यानेच पंचनामे करण्यास (Agricultural Department) कृषी अधिकारी बांधावर येत असल्याचे सांगितले जात आहे. श्रेय कोणीही घेऊ मात्र, शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागून त्यांना नुकसानभरापाईचा आधार मिळावा एवढेच.

3 लाख 20 हजार हेक्टरावरील क्षेत्र बाधित

हंगामाच्या सुरवातील पावसाअभावी याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली होती. असे असूनही खरीप हंगाम हा अडचणीत होता. मात्र, 1 जुलै रोजी सुरु झालेला पाऊस हा पिके आणि शेतकऱ्यांचे परिश्रम पाण्यात घालूनच गेला. सलग 15 दिवस पावसामध्ये सातत्य राहिले होते. त्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचे तर नुकसान झालेच पण शेत जमिनही खरडून गेली होती. जिल्ह्यातील तब्बल 3 लाख 20 हजार हेक्टर क्षेत्र हे बाधित झाले आहे. तर आतापर्यंत 1 लाख 60 हेक्टरावरील पिकांचे पंचनामे झाले आहेत. पावसाने उघडीप देताच कृषी विभागाचे अधिकारी हे बांधावर येऊन पंचनामे करीत आहे. ज्या पध्दतीने पंचनामे वेगात होत आहेत त्याचनुसार मदतही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावी अशी अपेक्षा आहे.

पंचनाम्यावरुनही रंगली राजकीय चर्चा

नांदेड जिल्ह्यात सुरु झालेले पंचनामे कुणामुळे ? अशी चर्चाही आता गावखेड्यांमध्ये रंगू लागली आहे. दोन दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माहूर तालुक्यातील पिकांची पाहणी केली होती. तर शेतकऱ्यांशीही संवाद साधला होता. त्यानंतरच या भागात पंचनाम्याला सुरवात झाली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असतानाच त्यांनी तीन दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पंचनामे नेमके कुणामुळे सुरु झाले याची चर्चा आता रंगू लागली आहे. श्रेय कोणी का घेईना पण गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागत आहे.

सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान

खरीप हंगामच आर्थिकदष्ट्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे. सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. या पिकावरच शेतकऱ्यांचे उत्पन्न अवलंबून असते. मात्र, गेल्या दोन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक परिणाम हा सोयाबीनवर झालेला आहे. गतवर्षी काढणीच्या वेळी तर यंदा पेरणी होताच हे पीक धोक्यात आहे. नांदेड जिल्ह्यात 3 लाख 20 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले असले तरी यामध्ये सर्वाधिक नुकसान हे सोयाबीनचे आहे.

Follow Us
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...