वापरलेल्या मास्कपासून पायपुसणी, नांदेडमधील धक्कादायक प्रकार, महापालिकेची विक्रेत्यांवर कारवाई

वापरलेल्या मास्क पासून पायापुसणी बनवून त्याची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आलाय. मास्कपासून बनवलेल्या पायापुसणी नांदेड शहरातील रस्त्यांवर विकल्या जात होत्या.

Reporter Rajiv Giri | Edited By: Akshay Adhav | Updated on: Oct 12, 2021 | 2:11 PM
1 / 4
वापरलेल्या मास्क पासून पायापुसणी बनवून त्याची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आलाय. मास्कपासून बनवलेल्या पायापुसणी नांदेड शहरातील रस्त्यांवर विकल्या जात होत्या.

वापरलेल्या मास्क पासून पायापुसणी बनवून त्याची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आलाय. मास्कपासून बनवलेल्या पायापुसणी नांदेड शहरातील रस्त्यांवर विकल्या जात होत्या.

2 / 4
याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या पथकाने ह्या पायपुसणी जप्त केल्या. सर्जिकल मास्क आणि विविध प्रकारच्या मास्क पासून या पायापुसणी बनवण्यात आल्या आहेत.

3 / 4
कापडी मास्क पासूनही या पायपुसणी बनवण्यात आलेल्या आहेत. आकाराने त्या छोट्या आहेत. वापरलेल्या मास्कपासून या पायापुसणी बनवण्यात आल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या पायपुसणी कोरोना पसरवण्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

4 / 4
परराज्यातून आलेले काही जण नांदेड शहरातील रस्त्यावर या पायपुसणी विकत होते. दिल्लीमधून पायपुसणी आणल्याचं या विक्रेत्यांनी पालिकेच्या पथकाला सांगितले. महापालिकेच्या पथकाने आय टी आय चौकातील 2 विक्रेत्यांकडून या पायापुसणी जप्त केल्या आहेत.

Follow Us