30 जानेवारीची निर्णायक सुनावणी, लेखी युक्तिवाद धनुष्यबाण देवून जाणार? पाहा टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Jan 24, 2023 | 11:27 PM

लेखी युक्तिवाद 30 जानेवारीच्या आत सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दोन्ही गटाला दिलेत. प्रत्यक्ष युक्तिवाद करताना काही मुद्दे राहिले असं वाटल्यास लेखी युक्तिवादाद्वारे अखेरची संधी निवडणूक आयोगानं दिलीय.

30 जानेवारीची निर्णायक सुनावणी, लेखी युक्तिवाद धनुष्यबाण देवून जाणार? पाहा टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
Follow us on

नवी दिल्ली : धनुष्यबाणाच्या लढाईसाठी 30 जानेवारीची तारीख शिंदे आणि ठाकरे गटासाठी फार महत्वाची आहे. कारण निवडणूक आयोग निकाल देण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. पण त्याआधीचा लेखी युक्तिवादही निर्णायक भूमिका बजावू शकतो. पाहुयात त्यावरचा हा रिपोर्ट. शिवसेना आणि धनुष्यबाणावर अंतिम फैसला 30 जानेवारीलाच येणार, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. केंद्रीय निवडणूक आयोगात ठाकरे आणि शिंदे गटाचा युक्तिवाद झालाय. पुढील सुनावणी 30 जानेवारीला आहे.

लेखी युक्तिवाद 30 जानेवारीच्या आत सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दोन्ही गटाला दिलेत. प्रत्यक्ष युक्तिवाद करताना काही मुद्दे राहिले असं वाटल्यास लेखी युक्तिवादाद्वारे अखेरची संधी निवडणूक आयोगानं दिलीय. शिंदे गट 30 जानेवारीपर्यंत लेखी उत्तर सादर करणार असून, ठाकरे गटाचा मात्र लेखी युक्तिवादासंदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही.

ठाकरे गटाकडून अॅड. कपिल सिब्बल तर शिंदे गटाकडून महेश जेठमलानींनी जोरदार युक्तिवाद केलाय. आता 30 जानेवारीची सुनावणी निर्णायक आहे.

हे सुद्धा वाचा

ठाकरे गटाच्या कपिल सिब्बलांचं म्हणणंय की, सुप्रीम कोर्टातल्या घटनापीठासमोर सत्तासंघर्षाचा निकाल येईपर्यंत आयोगानं निकाल देऊ नये. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल येण्याआधीच आयोगानं निकाल दिल्यास पेच निर्माण होईल म्हणजेच घटनापीठाचा निकाल येईपर्यंत निकाल राखून ठेवावा, अशी विनंती ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला केलीय.

तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या बंडामुळं शिवसेनेत फूटच पडलीय आणि लोकसभा, विधानसभेचे सदस्य पाहता चिन्हं आम्हालाच द्या असा युक्तीवाद शिंदे गटाचे वकील महेश जेठलमानींना केलाय.

त्यामुळं निवडणूक आयोगानं 30 जानेवारीच्या सुनावणीत निकाल सुनावणार की राखीव ठेवणार, हा तूर्तास तरी सस्पेंस आहे. शिंदे आणि ठाकरे गटाकडून, मात्र आपआपले दावे प्रतिदावे सुरु आहेत.

सत्तासंघर्ष आणि शिवसेनेच्या लढाईला आता 7 महिने होत आहेत. पुढच्या महिन्यात 14 फेब्रुवारीपासून घटनापीठासमोर नियमित सुनावणी होणार आहे. पण नेमका निकाल कधी येईल, हे ठोसपणे सांगता येत नाही. त्यामुळं अजित पवारांना तारीख पे तारीखच मिळेल असं वाटतंय. निवडणूक आयोगानं निकाल दिलाच, तर तो निर्णयच ऐतिहासिक असेल. मग ठाकरे गटालाच धनुष्यबाण मिळो की शिंदे गटाला.