शहराची बस सेवा होतेय वारंवार विस्कळीत, सिटी लिंकच्या कर्मचाऱ्यांची भूमिका काय?

| Updated on: Dec 02, 2022 | 9:54 AM

सिटी लिंक सेवा मात्र कामगारांना पगार न देण्यावरून सुरुवातीपासूनच वादात राहिली आहे. त्यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे.

शहराची बस सेवा होतेय वारंवार विस्कळीत, सिटी लिंकच्या कर्मचाऱ्यांची भूमिका काय?
Image Credit source: Google
Follow us on

चंदन पूजाधिकारी, नाशिक : नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्था पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. नाशिक शहरात पालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली सिटी लिंक बस सेवा पुन्हा एकदा खंडित झाली आहे. सिटी लिंकच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा काम बंद आंदोलन सुरू केले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पगार न दिल्याने कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद आंदोलनाचा इशारा देत काम बंद केले आहे. त्यामुळे जो पर्यन्त शहरातील बससेवा सुरळीत होत नाही तोपर्यंत मोठे हाल होणार आहे. यामध्ये सिटी लिंकच्या कर्मचाऱ्यांनी पगार द्या किंवा राजीनामे घ्या अशी भूमिका घेत आक्रमक भूमिका घेतली आहे. यापूर्वी बऱ्याचदा पगार न देणे, बोनस न देणे यावरून या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे. शहरातील ही परिस्थिती पाहता मोठा पेच निर्माण झाला असून यावर महापालिका प्रशासन हस्तक्षेप करून काही तोडगा काढते का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

नाशिक शहरात पालिकेच्या माध्यमातून कंपनी स्थापन करण्यात आली असून त्याद्वारे सिटी लिंकच्या नावाखाली बससेवा सुरू करण्यात आली होती.

नाशिक शहरातील बससेवा सिटी लिंक द्वारे सुरू असल्याने आणि कमी दरात असल्याने नागरिकांची मोठी पसंती मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

सिटी लिंक सेवा मात्र कामगारांना पगार न देण्यावरून सुरुवातीपासूनच वादात राहिली आहे. त्यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे.

आत्ताही कर्मचाऱ्यांनी दोन महिन्यांचा पगार न दिल्याने काम बंद आंदोलन सुरू केले असून एकतर पगार द्या नाहीतर राजीनामा घ्या अशी भूमिका घेतली आहे.

यापूर्वी देखील सिटी लिंक कंपनीचा कारभार आंदोलनामुळे वादात आला होता, आत्ताही पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवली असल्याने शहरातील बससेवा कोलमडली गेली आहे.

नाशिक शहरातील बस सेवा ठप्प झाल्याने शहरातील वाहतुक व्यवस्था विस्कळीत होणार असल्याने महापालिका यामध्ये हस्तक्षेप करून तोडगा काढणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.