तीन आमदारांना भिडणारा वादग्रस्त अधिकारी सक्तीच्या रजेवर, कोण आहेत हे अधिकारी ?

| Updated on: Nov 17, 2022 | 9:07 AM

कंकरेज यांच्याबाबत या तिन्हीही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार केली असून ते याबाबत हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार आहे.

तीन आमदारांना भिडणारा वादग्रस्त अधिकारी सक्तीच्या रजेवर, कोण आहेत हे अधिकारी ?
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : नाशिक जिल्हा परिषद मधील वादग्रस्त अधिकारी सुरेंद्र कंकरेज यांना अखेर सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. बांधकाम विभाग एकचे वादग्रस्त कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज यांच्या विरोधात जिल्ह्यातील तीन आमदारांनी तक्रार केली होती. यामध्ये आमदार हिरामण खोसकर, सुहास कांदे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी तक्रार केली आहे. तक्रारीत शासकीय कामात अनियमितता केल्याने कारवाई करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीतही वादग्रस्त अधिकारी गैरहजर होते. त्याच बैठकीत बांधकाम विभाग एकचे वादग्रस्त कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज यांच्या विरोधात तक्रारी आल्या होत्या.

दादा भुसे यांनी तात्काळ सीईओ आशिमा मित्तल यांना कंकरेज यांचा अहवाल तत्काळ शासनाला सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून सीईओ मित्तल यांनी कंकरेज यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. याबाबत शासनाला अहवाल सादर देखील केला आहे.

नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांनी पुढील आदेश होईपर्यंत कंकरेज यांना सक्तीच्या रजेवर आहे, त्यांचा कार्यभार बांधकाम विभाग दोनचे कार्यकारी अभियंता संजय नारखेडे यांच्याकडे सोपविला आहे.

हे सुद्धा वाचा

वादग्रस्त अधिकारी कंकरेज यांच्यामुळे कामे रद्द झाल्याचा आरोप आमदार खोसकर आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह सत्ताधारी पक्षाचे आमदार सुहास कांदे यांनी केला होता.

कंकरेज यांच्याबाबत या तिन्हीही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार केली असून ते याबाबत हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार आहे.

पालकमंत्री दादा भुसे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत मालेगावमधील कामांच्या बाबतीत अधिकाऱ्यांना उत्तर न देता आल्याने भुसे देखील जिल्हा परिषद प्रशासनावर नाराज आहेत.