कॉम्बॅट एव्हिएशन स्कूलचा ‘चित्तथरारक’ सोहळा…38 वी तुकडीचा दीक्षांत सोहळा कसा पार पडला ?

| Updated on: Dec 01, 2022 | 4:47 PM

हवाई हल्ले, जमिनीवरील आणि पाण्यातील हल्ल्यांना तोंड देण्यासाठीचे प्रशिक्षण, सहकाऱ्यांना रसद पुरविणे, जखमींना उपचार करणे अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण या जवानांना दिलेले असते.

कॉम्बॅट एव्हिएशन स्कूलचा चित्तथरारक सोहळा...38 वी तुकडीचा दीक्षांत सोहळा कसा पार पडला ?
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : नाशिकच्या गांधीनगर येथे नुकताच लष्कर अधिकाऱ्यांचा उपस्थित कॉम्बॅट आर्मी एव्हिएशनचा दीक्षांत सोहळा पार पडला आहे. यामध्ये 38 व्या तुकडीचा पदवी प्रधान सोहळा पार पडला आहे. अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर हे प्रशिक्षणार्थीं देशसेवेत रुजू होत असतात. त्यामुळे हा दीक्षांत सोहळा मोठ्या दिमाखात पार पडत असतो. या सोहळ्याला प्रशिक्षणार्थ्यांचे नातेवाईक देखील उपस्थित असतात. लष्कर अधिकाऱ्यांच्या उपस्थित हा सोहळा होत असल्यानं लष्करांच्या शिस्तीचे या ठिकाणी दर्शन होत असते. विशेष म्हणजे तिन्ही ऋतूत अतिशय खडतर प्रशिक्षण घेतलेल्यांपैकी काही प्रशिक्षणाचा भाग असलेले प्रात्यक्षिके सादर केली जातात. छातीत धडकी भरवणारे, चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली जातात. त्यामुळे हा दीक्षांत सोहळा पाहण्यासाठी काही खास मान्यवरांना निमंत्रित केलं जातं. युद्धभूमीवर होणार थरार येथे प्रात्यक्षिकांचा माध्यमातून सादर केला जात असल्याने देशसेवा करणाऱ्यांच्या बद्दलचे कार्य यामधून नाशिककरांना बघायला मिळाले आहे.

कॉम्बॅक्ट एव्हिशनच्या दीक्षांत सोहळ्यात युद्धभूमीवर होणाऱ्या प्रात्यक्षिकांमुळे युद्धभूमीवरील चित्र डोळ्यासमोर उभे राहिले होते.

प्रशिक्षणार्थी यावेळी संचलन सादर करीत असतात, एकाच वेळी शिस्तबद्ध पद्धतीने पडणारी पाऊलं, विशिष्ट प्रकारची देहबोली, युनिफॉर्म हे सगळं पाहून प्रत्येकाचा ऊर भरून येत असतो.

हे सुद्धा वाचा

देशसेवेत रुजू होणारे हे सगळे नवजवान उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांचे आणि नाशिककरांचे मन जिंकून घेत असतात.

हवाई हल्ले, जमिनीवरील आणि पाण्यातील हल्ल्यांना तोंड देण्यासाठीचे प्रशिक्षण, सहकाऱ्यांना रसद पुरविणे, जखमींना उपचार करणे अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण या जवानांना दिलेले असते.

लष्करी थाटात होणाऱ्या या कार्यक्रमात या तुकडीतील उत्कृष्ट जवानांना काही खास व्यक्तींच्या नावाने सन्मानित केले जात असते. सिल्वर चिंता ट्रॉफी यंदा नमन बनसाल यांना देण्यात आली आहे.