जागेच्या वादातून परभणीच्या जिंतूर येथे दोन गटात बाचाबाची; शहरात तणाव; पोलिसांच्या मध्यस्तीमुळे वादावर पडदा

| Updated on: May 08, 2022 | 11:18 PM

ही जागा आपल्या मालकीची आहे हे बांधकाम रोखण्यात यावे असा अर्ज माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी 21 मार्च रोजी याच जागेच्या मालकीच्या कागदपत्रासह नगरपालिकेकडे दाखल केला होता.

जागेच्या वादातून परभणीच्या जिंतूर येथे दोन गटात बाचाबाची; शहरात तणाव; पोलिसांच्या मध्यस्तीमुळे वादावर पडदा
परभणीतील जिंतूरमध्ये जमिनीच्या वादावरुन दोन गटात बाचाबाची
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

परभणी: परभणीच्या जिंतूर (Jintur Parbhani) शहरात जागेच्या मालकीच्या (Ownership of the premises) जुन्या वादातून दोन गटात बाचाबाची होऊन तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे जिंतूर शहरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान पोलिसांच्या मध्यस्तीनंतर प्रकरण शांत झाले. शहरातील येलदरी रोडवरील (Yeldari Road) जागेवर सय्यद मनखिद सय्यद हकीम यांनी बांधकाम सुरू केले होते. या जागेच्या मालकीची कागदपत्रे सय्यद मनखिद यांच्याजवळ असून बांधकामाची परवानगीही रितसरपणे नगरपरिषदेकडून घेण्यात आली आहे.

पण ही जागा आपल्या मालकीची आहे हे बांधकाम रोखण्यात यावे असा अर्ज माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी 21 मार्च रोजी याच जागेच्या मालकीच्या कागदपत्रासह नगरपालिकेकडे दाखल केला होता.

नगरपालिकेची मुखिद यांना नोटीस

त्यावरुन नगरपालिकेने मुखिद यांना नोटीस देऊन हे बांधकाम रोखल होते. दरम्यान आज काही लोकांनी त्या वादग्रस्त जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे दोन्ही गटात बाचाबाची झाली, यातून वादाला तोंड फुटले. त्यामुळे शहरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. मात्र जिंतूर पोलोसांनी वेळीच मध्यस्थी करून प्रकरण तात्पुरते मिटवले.

विकोपाल जाण्याआधीच पोलिसांची मध्यस्ती

हा वाद विकोपाल जाण्याआधीच पोलिसांनी मध्यस्ती केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यावेळी जिंतूरमधील नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन येथील पोलिसांनी केले.

जागेसमोर पोलिसांचा बंदोबस्त

सध्या या जागेसमोर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला आहे. येणाऱ्या दिवसात नगरपालिका याप्रकरणात कोणाच्या बाजूने निर्णय देते , याकडे दोन्ही गटाचे लक्ष लागून राहिले आहे. या वादावर प्रशासनाकडून लवकर पडदा पाडून हा मिठवण्याची गरज  आहे.

शाब्दिक चकमक

या जागेच्या वादामुळे शहर आणि परिसरातील सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. आजचा हा वाद विकोपाला जाण्याआधी पोलिसांनी मध्यस्ती केल्यामुळे शहरातील वातावरण शांत राहिले. यावेळी शाब्दिक चकमक झाली तरी पोलिसांकडून कोणताही वाढाचार करण्यात आला नसल्याने हे प्रकरण मिठले.