सांगलीत दिवे लावण्याच्या कारणावरुन जोरदार हाणामारी

| Updated on: Apr 06, 2020 | 12:51 AM

मिरजमध्ये दिवे लावण्याच्या कारणावरुन दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली (Fighting in Sangli on light off appeal by PM Modi).

सांगलीत दिवे लावण्याच्या कारणावरुन जोरदार हाणामारी
प्रातिनिधीक फोटो (संग्रहित)
Follow us on

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना रविवारी (5 एप्रिल) दिवे-टॉर्च लावण्याचं आवाहन केलं. मात्र, मिरजमध्ये दिवे लावण्याच्या कारणावरुन दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली (Fighting in Sangli on light off appeal by PM Modi). यानंतर पोलिसांनी तात्काळ धाव घेत दोन्ही कुटुंबातील ही हाणामारी नियंत्रणात आणली. एक कुटुंब दिवे लावण्याचा आग्रह करत होतं, तर अन्य कुटुंब दिवे लावण्यास विरोध करत होतं. यातून झालेल्या वादाचं रुपांतर थेट हाणामारीत झाला. अखेर पोलिसांना हस्तक्षेप करुन हे भांडण थांबवावं लागलं.

सांगलीतील या घटनेने पंतप्रधान मोदींच्या या आवाहनावरुन समाजात दोन गट पडल्याचं समोर आलं. तसेच या हाणामारीनं या दोन गटातील संघर्षही पाहायला मिळाल्याची चर्चा मिरजमध्ये आहे. पंतप्रधान मोदींच्या दिवे लावण्याच्या आवाहनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला. मात्र, अनेक ठिकाणी नागरिकांनी जमावबंदी आणि संचारबंदीचं उल्लंघन करत याला प्रतिसाद दिला. यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचा आवश्यक सोशल डिस्टन्सिंगचा नियम देखील पायदळी तुडवल्याचं पाहायला मिळालं. उस्मानाबादमध्ये मोदींच्या दिवे लावण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देताना कळंबमध्ये रस्त्यावर उतरुन फटाके फोडण्यात आले.

दरम्यान, सोलापूर विमानतळ परिसरात मोदींच्या दिवे लावण्याच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून दिवे लावून फटाके फोडण्यात आले. फटाक्यांमुळे सोलापूर विमानतळाजवळील गवताने पेट घेऊन भीषण आग लागली. सध्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे अथक प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने या आगीत जीवतहानी झालेली नाही.

विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींच्या टाळ्या वाजवण्याच्या आवाहनाला यापूर्वी देखील असाच प्रतिसाद मिळाला होता. गच्चीत येऊन टाळ्या वाजवायला सांगितलेले असताना अनेक नागरिकांनी रस्त्यावर येऊन ढोल आणि ताशाही वाजवला. त्यावेळी देखील संचारबंदी आणि जमावबंदीचं उघडउघड उल्लंघन झालं होतं.

संबंधित बातम्या :

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 748, तर मृतांची संख्या 45 वर : राजेश टोपे

VIDEO : दिवे लावून फटाके फोडले, सोलापुरात विमानतळ परिसरात भीषण आग

बंदरावर उतरण्यास स्थानिकांचा विरोध, डहाणूचे 700 खलाशी समुद्रात अडकले

भाजप आमदाराच्या वाढदिवसाला सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन, गर्दी जमवून जोरदार गोंधळ

Fighting in Sangli on light off appeal by PM Modi