मोफत शिवभोजन थाळीच्या मुदतीत वाढ, आतापर्यंत 4 कोटींहून अधिक थाळयांचे वितरण

| Updated on: May 21, 2021 | 3:46 PM

त्यामुळे येत्या 14 जूनपर्यंत नागरिकांना मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. (Free Shivbhojan Thali duration extended to one month)

मोफत शिवभोजन थाळीच्या मुदतीत वाढ, आतापर्यंत 4 कोटींहून अधिक थाळयांचे वितरण
शिवभोजन थाळी
Follow us on

मुंबई : राज्यात सुरु असलेल्या “ब्रेक द चेन” या प्रक्रियेअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध घटकांसाठी मदतीचे पॅकेज घोषित केले होते. त्यानुसार राज्यात सुरु असलेल्या शिवभोजन थाळीची मुदत एक महिन्यापर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 14 जूनपर्यंत नागरिकांना मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. (Free Shivbhojan Thali duration extended to one month)

अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 14 मे 2021 रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला होता. ब्रेक द चेन प्रक्रियेअंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीत प्रतिदिन दीडपट वाढ करण्यात आली आहे.

48 लाखांहून अधिक नागरिकांनी नि:शुल्क भोजनाचा लाभ

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी ब्रेक द चेन प्रक्रिया संपूर्ण राज्यभर राबविली जात आहे. या काळात राज्यातील गोरगरीब जनतेचे हाल होऊ नयेत, याची काळजी शासनाने घेतली आहे. राज्यात दिनांक 15 एप्रिल 2021 पासून शिवभोजन योजनेअंतर्गत नि:शुल्क थाळी उपलब्ध करून दिली जात आहे.

यानुसार 15 एप्रिल 2021  ते 20 मे 2021 पर्यंत  48 लाख 44 हजार 709 नागरिकांनी मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. या अडचणीच्या काळात  मोफत शिवभोजन थाळीने राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे.

आतापर्यंत 4 कोटींहून अधिक थाळयांचे वितरण

शिवभोजन थाळीची योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत 4 कोटी 27 लाख 81 हजार 306 थाळ्यांचे राज्यभरात वितरण करण्यात आले आहे. तर संपूर्ण राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत एकूण 950 केंद्र सुरु आहेत. (Free Shivbhojan Thali duration extended to one month)

संबंधित बातम्या : 

गरीब आणि मजूरांना शिवभोजनचा मोठा आधार, 3 कोटी नागरिकांकडून आस्वाद : छगन भुजबळ

आता शिवभोजन थाळी पार्सल मिळणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय