सिटी लिंक बस प्रशासनाने घेतला मोठा निर्णय, मोफत बस प्रवासाची ऑफर केली जाहीर

| Updated on: Oct 13, 2022 | 1:37 PM

दिव्यांग व्यक्तींना मोफत प्रवास देत असतांना महानगर पालिकेच्या सिटी लिंक बस प्रशासनाने काही अटी ठेवल्या आहेत.

सिटी लिंक बस प्रशासनाने घेतला मोठा निर्णय, मोफत बस प्रवासाची ऑफर केली जाहीर
Image Credit source: FACEBOOK
Follow us on

Nashik Citylinc Bus : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगर पालिकेच्या सिटी लिंक (NMC Citylinc) बस प्रशासनाने आनंदाची बातमी दिली आहे. नाशिक (Nashik) शहरात 01 नोव्हेंबरपासून दिव्यांग व्यक्तींना मोफत प्रवास (Free Travel) करता येणार आहे. याशिवाय सहप्रवाशाला देखील पन्नास टक्के सवलत मिळणार आहे. 40 टक्के किंवा त्याहून अधिक टक्केवारी असलेल्या दिव्यांगांना सिटीलिंकचा मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी त्याला सिटीलिंकच्या कार्यालयातून त्याबाबतचा मोफत पास काढून घ्यावा लागणार आहे. आर्थिक वर्षानुसार दरवर्षी हा पास काढावा लागणार असून त्याचा दिव्यांग व्यक्तींनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिव्यांग व्यक्तींना मोफत प्रवास देत असतांना महानगर पालिकेच्या सिटी लिंक बस प्रशासनाने काही अटी ठेवल्या आहेत.

मोफत बसचा प्रवास पास काढण्याकरिता 40 टक्के किंवा 40 टक्क्याच्या वर दिव्यांग व्यक्ती असणे बंधनकारक आहे.

हे सुद्धा वाचा

नाशिक महानगर पालिकेच्या हद्दीतीलच तो रहिवासी असावा, त्यासाठी त्याला रहिवासी पुरावा सादर करावा लागणार आहे.

आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असणार आहे.

14 ऑक्टोबरपासूनच शहरातील दिव्यांग व्यक्तींना पास काढता येणार असून त्या पासची मुदत 31 मार्च पर्यन्तच असणार आहे. त्यानंतर नवीन पास काढावा लागणार आहे.

६५ टक्के किंवा ६५ टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असल्यास आणि मोफत प्रवासाचा पास असल्यास सोबत असलेल्या सहप्रवाशाला देखील सवलत मिळणार आहे.

त्यामध्ये सहप्रवाशाला 50 टक्के सवलत मिळणार असून त्यासाठी मोफत पास सोबत बाळगने महत्वाचे असणार आहे.

नाशिक महानगर पालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या सिटी लिंक बससेवेच्या माध्यमातून मिळणाऱ्या या सुविधेबद्दल दिव्यांग व्यक्तींना मोठा दिलासा मिळणार आहे.