हिंगणघाटच्या निकालापासून ते हिजाबविरोधातल्या महाराष्ट्रातील पडसादापर्यंत! या 6 घडामोडींवर आज असणार महाराष्ट्राची नजर

| Updated on: Feb 09, 2022 | 7:16 AM

हिंगणघाट येथील बहुचर्चित अंकिता जळीतकांड प्रकरणाला 2 वर्षे पूर्ण झालेय. या प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे.

हिंगणघाटच्या निकालापासून ते हिजाबविरोधातल्या महाराष्ट्रातील पडसादापर्यंत! या 6 घडामोडींवर आज असणार महाराष्ट्राची नजर
Follow us on

१ गोव्यात आज महाराष्ट्राचे नेते आमनेसामने

गोव्यात आजा भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आमनेसामने असणार आहेत. येत्या सोमवारी गोव्यात मतदार पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि जितेंद्र आव्हाड गोवा दौऱ्यावर आहेत. तर सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील घरोघरी जावून करणार गोव्यात प्रचार करणार आहेत.

२ काँग्रेसची मोदींविरोधात आंदोलनं!

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसतर्फे आज सकाळी मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करून महाराष्ट्राचा अवमान केल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करण्यात येणार आहे. फक्त मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आज ठिकठिकाणी काँग्रेसकडून मोदींविरोधात निदर्शनं केली जाणार आहे.

३ मंत्रिमंडळाची बैठक

आज मंत्रिमंडळाची दुपारी बैठक पार पडणार आहे. या बैठकीला कोरोना अनलॉक प्रक्रियेच्या अनुशंगानं महत्त्व प्राप्त झालंय. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी लढा दिल्यानंतर आता सरकार काय महत्त्वाचे निर्णय बैठकीत घेतं हे पाहणं महत्त्वाचंय.

४ अनिल देशमुखांचं काय होणार?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज ईडी कडून उत्तर दिला जाणार असून त्यानंतर विशेष पीएमएलए कोर्टात देशमुख यांच्या जामिन अर्जावर सुनावणी होणार आहे. पुरवणी आरोप पत्र दाखल केल्यानंतर देशमुख तर्फे नियमित जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. या जामीन अर्जावर काय निर्णय होतो, याकडे महाराष्ट्र पोलिसांसह राजकीय वर्तुळाचीही नजर लागली आहे.

५ संपूर्ण महाराष्ट्राची नजर असलेली बातमी!

हिंगणघाट येथील बहुचर्चित अंकिता जळीतकांड प्रकरणाला 2 वर्षे पूर्ण झालेय. या प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे. अंकिता जळीतकांड प्रकरणात सरकारी आणि आरोपी पक्षातर्फे युक्तिवाद पूर्ण झालाय. जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश भागवत यांच्यासमोर सरकारी पक्ष आणि बचाव पक्षातर्फे युक्तिवाद सुरू होता. तो 21 जानेवारीला पूर्ण झाला होता. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे 29 साक्षीदार तपासण्यात आले होते. याप्रकरणी आज काय निकाल लागतो, हे पाहणं महत्त्वाचंय.

६ कर्नाटकातील हिजाबविरोधाचे महाराष्ट्रात पडसाद

कर्नाटकातील हिजाबविरोधात पडसाद मंगळवारपासूनच उमटालया सुरुवात झाली होती. त्यानंतर आता आज कोल्हापुरातही या वादाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. फक्त कोल्हापुरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हिजाब विरुद्ध भगवा या प्रकरणी काय प्रतिक्रिया उमटतात, यावरही दिवसभर सगळ्यांची नजर असणार आहे. तर दुसरीकडे जय श्रीराम विरोधात अल्ला-हूँ-अकबर घोषणा देण्याऱ्या मुस्कानला 5 लाखांचे बक्षिस जमीयत उलेमा-ए-हिंद संस्थानं जाहीर केलंय. त्यामुळे या प्रकरणाला आता आणखी वेगळं वळणं लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

डीएचएफएलच्या रिझोल्युशन प्लॅनला झटका, कर्जदाते लटकले, पैसे मिळण्यास विलंब होणार?

School reopen : शनिवारी, रविवारीही शाळा सुरूच ठेवा, अजित पवारांच्या शिक्षाकांना काय सूचना?

काँग्रेसच्या पाठीत तुम्ही खुपसलेला खंजीर विसरलात का? सुप्रियाताई इतिहास जागृत करा, विखे-पाटलांचा खोचक टोला