Gondia : एकतर्फी प्रेमातून तिघांवर चाकू हल्ला! 17 वर्षीय आरोपीचा 12 वर्षांच्या मुलीला प्रमोज आणि धमकी

| Updated on: Apr 27, 2022 | 2:13 PM

Gondoa Murder : 12 वर्षीय मुलीला प्रपोज केले असता मुलगी आपल्या सोबत बोलत नाही म्हणून आरोपी तरुणाने तिच्या घरी जाऊन तिच्या आईसमोरच तिला धमकावलं होतं.

Gondia : एकतर्फी प्रेमातून तिघांवर चाकू हल्ला! 17 वर्षीय आरोपीचा 12 वर्षांच्या मुलीला प्रमोज आणि धमकी
खळबळजनक घटना
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

गोंदिया : गोंदिया (Gondia crime) शहरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोंदियात एका अल्पवयीन तरुणानं (Minor girl proposed by minor boy) अल्पवयीन मुलीला प्रेमाची मागणी घातली. त्यानंतर या मुलीनं बोलणं सोडल्यानं तरुणानं मुलीला धमकावलंही. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीच्या आईदेखत तरुणानं मुलीला धमकावलं होतं. म्हणून मुलीच्या आईन आपल्या नातेवाईकांची मदत मागितली होती. दरम्यान, मुलीच्या तिघाही नातेवाईकांवर अल्पवयीनं तरुणानं जीवघेणा हल्ला (Attempt to murder) केला आहे. चाकून केलेल्या या हल्ल्यात तिघांपैकी दोघेजण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. दोघांचीही प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आलं. मात्र गंभीर जखमी असलेल्या दोघांची प्रकृती अधिकच चिंताजनक बनत चालल्यानं त्यांना नागपूर रुग्णालयात आणण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांकूडन अधिक तपास आता केला जातो आहे.

आधी प्रपोज, मग बोलत नाही म्हणून…

गोंदिया शहरात एका 17 वर्षांच्या तरुणानं आपल्यापेक्षा पाच वर्षांनी लहान असलेल्या मुलीला प्रपोज केलं. 12 वर्षीय मुलीला प्रपोज केले असता मुलगी आपल्या सोबत बोलत नाही म्हणून आरोपी तरुणाने तिच्या घरी जाऊन तिच्या आईसमोरच तिला धमकावलं होतं. चाकूने मारण्याची या तरुणाननं मुलीला दिली होती.

मुलीच्या आईने या संदर्भात आपल्या नातेवाईकांना सांगितलं आणि त्यांची मदत मागितली होता. मला एक मुलगा त्रास देतोय, असं सांगत नातलगांकडे या अल्पवयीन मुलीनं मदत मागितली होती. त्यावेळी नातलगांना या मुलीची छेडछाड काढणाऱ्याला जाब विचारला. त्यावेळी आरोपीने मुलीच्या तीन नातेवाईकांपैकी दोघांवर चाकूने सपासप वार करत त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. 24 एप्रिलच्या रात्री ही धक्कादायक घटना घडली. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक!

अल्पवयीन तरुणानं केलेल्या हल्ल्यामध्ये 18 वर्ष व असलेले अभिषेक वर्मा, 26 वर्षीय परमानंद नागभिडे, 28 वर्षीय धर्मराज बावनकर हे तिघे जखमी झालेत. यातील परमानंद आणि धर्मराज यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचाराशाटी आता नागपूरच्या रुग्णालयात आणण्यात आलं आहे. तरत अभिषेक वर्मा याच्यावर गोंदियाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलिसांकडून केला जातो आहे. चाकू हल्लाप्रकरणानंतर पोलिसांनी एट्रोसिटीअंतर्गत गुन्हादेखील नोंदवला आहे.