गोंदिया जिल्हा हा पूर्वी भंडारा जिल्ह्याचाच एक भाग होता. भंडारा जिल्ह्याच्या विभाजनाने गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्राच्या उत्तर-पूर्व बाजूला असून मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमावर्ती भागात आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंड आदिवासी समाज मोठ्या संख्येने असल्यामुळे जिल्ह्याला गोंदिया असे नाव देण्यात आले. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 5,431 चौरस किलोमीटर आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 13,22, 635 एवढी आहे. यामध्ये पुरुषांची संख्या 6,62,656 तर महिलांची संख्या 6,59, 964 इतकी आहे. जिल्ह्यात महिला पुरुष गुणोत्तराचे प्रमाण 1000 मागे 991 इतके आहे. जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण 84.95 टक्के आहे. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून तांदूळ हे येथील मुख्य पीक आहे. गोंदियाला तांदळाचे शहर म्हणून देखील ओळखले जाते. जिल्ह्यात गोंदिया, तिरोरा, गोरेगाव, देवरी, आमगाव, सेल्कासा, अर्जुनी मोरगाव, आणि सडक अर्जुनी असे एकूण आठ तालुके आहेत. जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत, ज्यामध्ये गोंदिया, तिरोडा, गोरेगांव, आमगाव, लाखांदूर आणि साकोली या मतदार संघाचा समावेश होतो. जिल्ह्यात एकूण 954 गावे असून, 556 ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्यातील आठही तालुक्यात पंचायत समित्या आहेत. तर गोंदिया आणि तिरोडा अशा दोन नगर परीषद आहेत. वैनगंगा ही जिल्ह्यातील सर्वात महत्वाची नदी असून, बाग, चुलबंद, गढवी व बावनथडी जिल्ह्यातील या नद्या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. हाजरा धबधबा, चिचगड, नागझिरा वन्यजिव अभयारण्य, नवेगांव नॅशनल पार्क ही जिल्ह्यातील काही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत.
गोंदियाच्या राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही 9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.
हे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर 5 मे ते 5 जून या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या उन्हाळी शिबिरात देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर ...
या वाघिणी दीड ते दोन वर्षांच्या असून या वाघिणींना काही दिवस खुल्या पिंजर्यात ठेवण्यात येईल. मग रेडिओ कॉलर लावून नवेगाव-नागझिरा व्याघ प्रकल्पात सोडले जाईल. बिलाल ...
गावकऱ्यांना 18 किलोमीटरचा प्रवास पायी किंवा दुचाकी वाहनाने करावा लागतो. मुरकुटडोह दंडारी गावाची लोकसंख्या जवळपास 700 च्या आत आहे. या गावाला लागून मध्य प्रदेश, छत्तीसगढ ...
या तेंदुपत्ता संकलनातून रोजगाराशिवाय कोट्यवधी रुपयाची उलाढाल एकट्या गोंदिया जिल्ह्यातून होते. यातून रोजगार मिळत असल्याचं मजूर चंद्रशेखर बडोले व मोजणी करणारे परसराम जांभुळकर यांनी सांगितलं. ...
अंघोळ करण्यासाठी म्हणून तो पाण्यात उतरला. कालव्यातील पाण्याचा अंदाज त्याला आला नाही. तो आणखी खोलात गेला. हातपाय मारण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात त्याला काही यश ...
53 जागांसाठी गोंदिया जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. त्यापैकी 26 जागा भाजपला मिळाल्या. काँग्रेस 13, चाबी 4, राष्ट्रवादी 8, अपक्ष दोन असे पक्षीय बलाबल आहे. ...
अज्ञात चोरट्यांनी समोरच्या अंगणात कुटुंब झोपले असल्याचे बघीतले. मागच्या बाजूने प्रवेश करीत चोरट्याने घरात प्रवेश केला. धाब्यावरील दागिन्यांची पेटी घेऊन घराबाहेर पेटी उघडून दागिने व ...
Gondoa Murder : 12 वर्षीय मुलीला प्रपोज केले असता मुलगी आपल्या सोबत बोलत नाही म्हणून आरोपी तरुणाने तिच्या घरी जाऊन तिच्या आईसमोरच तिला धमकावलं होतं. ...
रस्ते अपघाता संदर्भात साकोली आणि डुगीपार पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र कुठलीही कारवाई संबंधित कंपनीवर न झाल्याने सुचिता आगाशे, लता दुरुगकर, सुरेखा साखरे, ...