AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्लिम तरूणाने साकारली राम मंदिराची प्रतिकृती, सर्वत्र होतेय कौतुक

आमगाव शहरातील हाफिज अन्वर शेख या युवकांनी प्रभू रामचंद्राच्या आयोध्येतील मंदिराची प्रतिकृती या  कलाकार ने हुबेहूब सादर करण्याचा प्रयत्न केला, असून ही प्रतिकृती गोंदिया शहरातील दुर्गा चौक येथील दुर्गा मंदिरात लावण्यात आलेली आहे.

मुस्लिम तरूणाने साकारली राम मंदिराची प्रतिकृती, सर्वत्र होतेय कौतुक
राम मंदिराची प्रतिकृतीImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Jan 20, 2024 | 9:03 PM
Share

गोंदिया : 22 जानेवारी रोजी संपूर्ण भारतातच नव्हे तर जगातसुद्धा प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishta) समारोह उत्साहात साजरा होत आहे आणि त्या निमित्ताने संपूर्ण भारतात श्री रामाचे भक्त मोठ्या उत्साहात प्रभू रामचंद्राच्या हा उत्सव साजरा करीत आहेत. यानिमित्त अनेक ठिकाणी सजावट, मंदिराची रोषणाई असे विविध प्रकारचे देखावे हे तयार करण्यात येत आहेत. अश्यातच गोंदिया शहरातील  दुर्गा मंदिर येथे प्रभू रामचंद्राच्या अयोध्येच्या मंदिराची प्रतिकृती एक मुस्लिम युवक हाफीज अन्वर शेख या युवकांनी बनवली आहे.  ही प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात मंदिरात गर्दी करत असल्याचे दिसून येते.

लोकांकडून होत आहे कौतूक

आमगाव शहरातील हाफिज अन्वर शेख या युवकांनी प्रभू रामचंद्राच्या आयोध्येतील मंदिराची प्रतिकृती या  कलाकार ने हुबेहूब सादर करण्याचा प्रयत्न केला, असून ही प्रतिकृती गोंदिया शहरातील दुर्गा चौक येथील दुर्गा मंदिरात लावण्यात आलेली आहे. हाफिज कलाकार असून त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून जे नागरिक अयोध्येला प्रभू रामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी जाऊ शकत नाही अशा नागरिकांकरीता गोंदिया शहरातील दुर्गा मंदिरात या प्रतिकृतीची स्थापना करण्यात आली आहे. ही प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. नागरीकांकडून मोठ्या प्रमाणात कौतूक होत आहे.

मुंबईचा डबेवाला 22 जानेवारीला सुट्टीवर

अयोध्येतील श्रीराम मंदिर जिर्णोद्धार आणि मुर्ती प्राणप्रतिष्ठापणेच्या निमित्त्याने मुंबई डबेवाल्यांनी सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी आपला व्यावसाय बंद ठेवत श्री रामाच्या आगमनाचा आनंदोत्सव साजरा करण्याचे निश्चित केले आहे. या उत्सवाची सुरूवात आज ग्रँड रोड येथे श्री सत्यनारायणाची महापूजा, आरती, भजन, महाप्रसाद आणि किर्तनाने होणार आहे. समस्त मुंबई डबेवाला कामगारांंमध्ये भक्तीभावाचे नवचैतन्य संचारले आहे.

असा पुरूष सिंह होणे नाही... संजय राऊतांकडून बाळासाहेबांना मानवंदना
असा पुरूष सिंह होणे नाही... संजय राऊतांकडून बाळासाहेबांना मानवंदना.
अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसैनिकांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसैनिकांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?.
लाडक्या बहिणींनो... उरले फक्त शेवटचे काही तास, E-KYC बद्दल मोठी अपडेट
लाडक्या बहिणींनो... उरले फक्त शेवटचे काही तास, E-KYC बद्दल मोठी अपडेट.
बाळासाहेबांच्या 13 व्या स्मृतीदिनी शिवाजी पार्कात शिवसैनिकांची गर्दी
बाळासाहेबांच्या 13 व्या स्मृतीदिनी शिवाजी पार्कात शिवसैनिकांची गर्दी.
भाजपनं चंद्रावर कॉलनी काढली...आदित्य ठाकरेंच्या टोमण्यावर भाजपचं उत्तर
भाजपनं चंद्रावर कॉलनी काढली...आदित्य ठाकरेंच्या टोमण्यावर भाजपचं उत्तर.
लालूंच्या घरात चाललंय काय? तेजस्वी यादव-रोहिणी आचार्य यांच्यात भांडण
लालूंच्या घरात चाललंय काय? तेजस्वी यादव-रोहिणी आचार्य यांच्यात भांडण.
भाजपचे शरद पवार दादांच्या गटात, 5 वर्षात 5 पक्ष फिरुन पुन्हा भाजपवासी
भाजपचे शरद पवार दादांच्या गटात, 5 वर्षात 5 पक्ष फिरुन पुन्हा भाजपवासी.
इंदुरीकरांचं चॅलेंज अन् गुड्डीवरून डबेवालाकडून इशारा,..तर जाब विचारणार
इंदुरीकरांचं चॅलेंज अन् गुड्डीवरून डबेवालाकडून इशारा,..तर जाब विचारणार.
माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान
माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान.
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण.