AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टिपू सुलतान हा गंधा माणूस, त्याने आयबहिणी… भाजपच्या आमदाराचं मोठं विधान; राज्यभरात काँग्रेस विरोधात पडसाद

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना करताना शिवाजी महाराज सारखा योद्धा म्हणून उल्लेख केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याभरात निषेद व्यक्त करण्यात आला.

टिपू सुलतान हा गंधा माणूस, त्याने आयबहिणी... भाजपच्या आमदाराचं मोठं विधान; राज्यभरात काँग्रेस विरोधात पडसाद
Harshawardhan SakpalImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 15, 2026 | 1:22 PM
Share

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. भाजपच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांकडून जोरदार आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर जालन्यात देखील भारतीय जनता पक्षाचे आमदार नारायण कुचे आक्रमक भूमिका मांडताना दिसले. त्यांच्यासोबत त्यांचे पदाधिकारी देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले असल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, नारायण कुचे यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

काय म्हणाले नारायण कुचे?

टिपू सुलतान हा गंधा माणूस. त्याने आई-बहीण असेल आणि जातीजातीत भांडण लावण्याचे काम केलं, असा जोरदार हल्लाबोल भाजप आमदार नारायण कुचे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यानंतर केला आहे. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांनी तात्काळ माफी मागावी असा देखील इशारा नारायण कुचे यांनी दिला आहे.

पनवेलमध्ये राजकीय वातावरण तापलं

हर्षवर्धन सकपाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्यासोबत केल्याच्या विधानाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. पनवेलमध्ये भाजपकडून जोरदार निषेध आंदोलन करण्यात आला आहे. त्यासाठी प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौक येथे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने जमले. आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करत सकपाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी महिलांनी आक्रमक भूमिका घेत सकपाळ यांच्या प्रतिमेला चप्पल मारून संताप व्यक्त केला. “छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

राज्यात इतर ठिकाणीही आंदोलन

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या वतिने क्रांती चौकात आंदोलन करण्यात आले. पोस्टरला जोडे मारत काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान सोबत केली म्हणून हे आंदोलन करण्यात आले. तर नागपूरमध्ये भाजप युवा मोर्चाने देखील आंदोलन केले. येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त केला आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.