Ashok Kharat | रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे… अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप
सध्या राज्यभरात भोंदूगिरी आणि फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडवली आहे. या प्रकरणात एक नाव वारंवार घेतलं जात आहे ते म्हणजे 'रुपाली चाकणकर'. अलीकडेच अंजली दमानिया यांनी भोंदूबाबा प्रकरणात धक्कादायक खुलासे केले आहेत.
सध्या राज्यभरात भोंदूगिरी आणि फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडवली आहे. या प्रकरणात एक नाव वारंवार घेतलं जात आहे ते म्हणजे ‘रुपाली चाकणकर’. अलीकडेच अंजली दमानिया यांनी रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यातील 177 फोन कॉल्सची माहिती उघड केली आहे. यामध्ये त्यांनी आणखी एका बड्या नेत्याचे नाव उघड केले असून या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
अंजली दमानियांच्या आरोपांनुसार, रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात 177 वेळा तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अशोक खरातला 17 फोन केल्याचे पुराव्यांमध्ये दिसत आहे. हे कॉल नेमके कशासाठी केले? असा थेट प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या अजिली दमानिया यांनी केला आहे. दरम्यान अंजली दमानिया यांनी ही संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांना तसेच SIT च्या प्रमुख अधिकाऱ्यांना पाठवल्याचही सांगितलं.
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...

