AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Points Table : पंजाब किंग्सचा धमाका, दुसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप

IPL 2026 Points Table : पंजाब किंग्सने आयपीएल 2026 स्पर्धेत शुक्रवारी 3 एप्रिलला चेन्नईला पराभूत केलं. पंजाब यासह सलग आणि एकूण 2 सामने जिंकणारी पहिली टीम ठरली. पंजाबने यासह पॉइंट्स टेबलमध्ये टॉपर ठरली.

IPL 2026 Points Table : पंजाब किंग्सचा धमाका, दुसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप
Ruturaj Gaikwad and Shreyas IyerImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 04, 2026 | 9:17 AM
Share

पंजाब किंग्सने आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमात (IPL 2026) श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात सलग दुसरा सामना जिंकला. पंजाबने गुजरात टायटन्सनंतर शुक्रवारी 3 एप्रिलला यजमान चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केलं. पंजाबने या विजयासह धमाका केला. पंजाबने चेन्नईला पराभूत करुन राजस्थान रॉयल्सलाही झटका दिला. पंजाबने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. पंजाबमुळे राजस्थान रॉयल्सची दुसऱ्या स्थानी घसरण झाली. तसेच याचा परिणाम इतर संघांवरही झालेला पाहायला मिळाला. एका बाजूला पंजाब पहिल्या स्थानी पोहचली. तर चेन्नई सलग दुसऱ्या पराभवामुळे पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी 10 व्या स्थानी घसरली आहे.

पंजाब कमाल, सीएसके बेहाल

पंजाबने याआधी या मोहिमेतील आपला पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध खेळला होता. पंजाबने या सामन्यात गुजरातवर 3 विकेट्सने विजय मिळवला होता. तर आता पंजाबने चेन्नईवर 5 विकेट्सने विजय साकारला. पंजाबने चेन्नईकडून मिळालेलं 210 धावांचं आव्हान 8 बॉलआधी पूर्ण केलं. पंजाबच्या खात्यात 2 विजयासह एकूण 4 गुण झाले आहेत. तर पंजाबचा नेट रनरेट हा 0.673 इतका झाला आहे. तर चेन्नईचा सलग दुसऱ्या पराभवानंतर नेट रनरेट हा -2.562 असा झाला आहे.

चेन्नई विरुद्ध पंजाब हा आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामातील सातवा सामना होता. या सामन्याच्या निकालानंतर इतर संघांवरही परिणाम झालाय. राजस्थान रॉयल्सची दुसऱ्या तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची तिसऱ्या स्थानी घसरण झालीय. या सामन्याआधी मुंबई चौथ्या स्थानी होती. मुंबई पंजाबच्या विजयानंतर पाचव्या तर दिल्ली चौथ्या स्थानी पोहचली आहे. राजस्थान,आरसीबी, दिल्ली आणि मुंबई हे 4 संघ अजिंक्य आहेत. या 4 संघाच्या खात्यात प्रत्येकी 2 गुण आहेत.

तर 4 संघ अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. या 4 संघांमध्ये चेन्नई व्यतिरिक्त, गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचा समावेश आहे.

श्रेयस आर्मी नंबर 1

शनिवारी डबल हेडरचा थरार

दरम्यान शनिवारी 4 एप्रिलला 19 व्या मोसमातील पहिल्या डबल हेडरचा थरार रंगणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत. हा सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. तर दुसरा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. राजस्थानला हा सामना जिंकून पंजाबला पॉइंट्स टेबलमध्ये मागे टाकण्याची संधी आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा