Solapur Madha Controversy | अंजन गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; दोन्ही गटात संवाद साधून प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा
सोलापूरच्या माढ्यातील अंजन गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. परिसरात पोलिसांनी बॅरिकेटिंग करून सुरक्षा वाढवली आहे. दोन गट आमने-सामने आले असून, एका गटाचे प्रतिनिधी आणि ओबीसी कारकर्ते लक्ष्मण हाके यांनी हा पुतळा शासकीय जागेत स्थलांतरित होईपर्यंत ठिय्या देण्याची घोषणा केली आहे.
सोलापूरच्या माढ्यातील अंजन गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. परिसरात पोलिसांनी बॅरिकेटिंग करून सुरक्षा वाढवली आहे. दोन गट आमने-सामने आले असून, एका गटाचे प्रतिनिधी आणि ओबीसी कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनी हा पुतळा शासकीय जागेत स्थलांतरित होईपर्यंत ठिय्या देण्याची घोषणा केली आहे. मात्र दुसऱ्या गटाने आक्रमक प्रतिक्रिया देत विरोध व्यक्त केला आहे.
माढा तालुक्यातील अंजन गावात 31 मार्च रोजी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. हा पुतळा खेळोबा ट्रस्टच्या जागेत बसवला गेला होता. ट्रस्टने पुतळा हटवण्याची भूमिका मांडली आहे, तर पुतळा बसवलेली जागा PWD च्या अंतर्गत येते. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांत मतभेद निर्माण झाले. प्रशासनाने 1 एप्रिलच्या रात्री पुतळा काढण्यासाठी क्रेन आणली, परंतु पुतळा बसवणाऱ्या गटाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आले. त्यानंतर 2 एप्रिलला पुतळा बसवणाऱ्या गटाचे प्रतिनिधी बाळराजे आवारे पाटील यांनी कॉर्नर सभा घेत पुतळा हटवणार नाही, अशी भूमिका ठामपणे मांडली, तर लक्ष्मण हाके यांनी त्याच दिवशी पुतळा स्थलांतरित करावा अशी भूमिका मांडली.
दरम्यान, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आमदार अभिजीत पाटील यांच्यासह दोन्ही गटांच्या स्वतंत्र बैठका घेऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनांमुळे अंजन गावात राजकीय आणि सामाजिक तणाव वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
Published on: Apr 03, 2026 01:53 PM
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता

