AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोपटाचा जीव अडकला गाण्यात, मोबाईल बघताच... Video व्हायरल

पोपटाचा जीव अडकला गाण्यात, मोबाईल बघताच… Video व्हायरल

| Updated on: Sep 12, 2025 | 1:03 PM
Share

शिरपूर गावातील एका पोपटाला मोबाईलची अफाट लत लागली आहे. हा पोपट मोबाईलवर गाणी ऐकण्यासाठी अगदी वेडा आहे आणि जर कोणी त्याला मोबाईलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तर तो चोचीने चावतो. या पोपटाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि ही घटना गावात चर्चेचा विषय बनली आहे.

लहान मुलं असोत की तरूण मंडळी, नाहीतर मोठी माणसं.. सर्वांच्यात एक गोष्ट कॉमन आहे. ते म्हणजे आजकाल सर्वांच्या हातात सतत मोबाईल दिसतोच. कोणीही माणूस बघा, मान खाली घालून मोबाईवर काहीतरी टाईप करत असतो, किंवा काहीतरी पाहत, वाचत असतो. पण मोबाईलचं हे व्यसन फक्त माणसांपुरतं मर्यादित नाही तर पक्ष्यांमध्येही दिसून येतंय. वाचून धक्का बसला ना ? पण हे खरं आहे. फक्त माणसाला नव्हे तर आतात एक पोपटालाही मोबाईलची लत लागल्याचे दिसून आले. मोबाईलमध्ये जीव अडकलेला हा पोपट त्याला कोणाला हातही लावू देत नाही. या संदर्भातला एक व्हिडीओ देखील समोर आला असून बघता बघता तो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल देखील झाला. शिरपूरमधील ही घटना असून पोपटाचं मोबाईल प्रेम गावकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

पोपटाला लागली मोबाईलची सवय

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील शिरपूर या गावात हा आगळावेगळा किस्सा घडला आहे. तेथे एका पोपटाला मोबाईलची सवय लागली आहे. शिरपूर गावात राहणारे, विजय रातपूत यांच्या घरातील पाळीव पोपटाला मोबाईलची सवय लागली आहे. विशेष म्हणजे त्याला इतकी सवय लागली आहे की, मोबाईलमध्ये गाणं सुरू असताना तो पोपट इतर कोणालाही मोबाईलला हात लावू देत नाही.

जर कोणी त्याच्याजवळून मोबाईल जवळून हलवण्याचा किंवा उचलण्याचा प्रयत्न केला, तर पोपट त्यांना चावा घेतो. एवढंच नव्हे तर हा पोपट समोर असलेल्या त्या मोबाईलवर आपल्या चोचीने टच करून त्यावर गाणं सुरू करण्याचा प्रयत्नही करतो. गावातील नागरिकांना ही गोष्ट कळताच हा पोपट गावातील चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे आता मोबाईलचे व्यसन मोबाईलचे व्यसन हे आता फक्त माणसांपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर हळूहळू प्राण्यांनाही लागले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या पोपटाचे मोबाईल प्रेम पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

 

 

Published on: Sep 12, 2025 01:03 PM