AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसला खिंडार! प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच मोठा धक्का, अनेकांचा भाजपात प्रवेश

Maharashtra Politics : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना स्वतःच्या जिल्ह्यातच मोठा धक्का बसला आहे. चिखली विधानसभा क्षेत्रातील अनेक स्थानिक काँग्रेस नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केली आहे.

काँग्रेसला खिंडार! प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच मोठा धक्का, अनेकांचा भाजपात प्रवेश
Congress BJP Image Credit source: X
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 07, 2026 | 5:25 PM
Share

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पक्षांतर पहायला मिळाले होते. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे. निवडणुका पार पडल्यानंतरही आता पुन्हा पक्षांतर होताना पहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना स्वतःच्या जिल्ह्यातच मोठा धक्का बसला आहे. चिखली विधानसभा क्षेत्रातील अनेक स्थानिक काँग्रेस नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बुलढाण्यात काँग्रेसला मोठा धक्का

बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसच्या अनेक स्थानिक नेत्यांनी तसंच पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नंदू सवडतकर, काँग्रेसचे नेते गुलाबराव सपकाळ, काँग्रेसचे चिखली शहराध्यक्ष राहुल सवडतकर, चिखली पंचायत समितीचे माजी सभापती अरविंद देशमुख, किसान काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद पालवे, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अमोल काकडे, शेलोडीचे माजी सरपंच दिलीप नरवाडे, शिवव्याख्याते संतोष गवारे पाटील, विशाल सवडतकर, प्रदीप सवडतकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.

पक्षाची चिंता वाढली

महत्वाची बाब म्हणजे हा जिल्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचाच गृहजिल्हा आहे. मात्र तरीही मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे लोक भाजपासह अन्य पक्षांत जात असल्याने चिंता वाढली आहे. प्रदेशाध्यक्षांच्या गृहजिल्ह्यात काँग्रेस पक्षाची अवस्था अत्यंत चिंताजनक बनत चालली आहे. त्यामुळे पक्षाची चिंता वाढली आहे. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला आमदार श्वेताताई महाले, भाजयुमो प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक, भाजपाचे मुख्य प्रवक्ता नवनाथ बन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खराब कामगिरी

दरम्यान, अलिकडेच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला चांगली कामगिरी करता आलेली नाही. पक्षाने मोजक्याच ठिकाणी विजय मिळवला होता. त्याच बरोबर निवडणुकीपूर्वी पक्षाच्या अनेक नेत्यांनी पक्षांतर केले होते. त्याचाच फटका पक्षाला निवडणुकीत बसलेला पहायला मिळाला.

Follow Us
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!