लग्नासाठी निघाले होते, पण इतक्यात कारचा अपघात… दीड वर्षांच्या चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू तर…

Gondia Tiroda Car Accident : मागच्या काही दिवसात अपघातांची संख्या वाढते आहे. अशातच आता आणखी एक अपघात समोर आलाय. लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्या तवेरा कारला भीषण अपघात झालाय. यात तिघांचा मृत्यू झालाय. तसंच जखमींना उपचारांसाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे.

लग्नासाठी निघाले होते, पण इतक्यात कारचा अपघात... दीड वर्षांच्या चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू तर...
Follow us
| Updated on: Dec 27, 2023 | 9:22 AM

तिरोडा, गोंदिया | 27 डिसेंबर 2023 : दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढते आहे. अशातच एक भीषण अपघात समोर आला आहे. लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीला अपघात झाला आहे. तवेरा गाडीला भीषण अपघात झालाय. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर सहा जण गंभीर रित्या जखमी झालेत. या मृतांमध्ये दीड वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. लग्नाची वरात घेऊन जात असताना अचानक हा अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लग्नासाठी निघाले असता हा अपघात झाल्याने परिसर हळहळला आहे.

तवेरा गाडीचा अपघात

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्या अंतर्गत येत असलेल्या एकोडी दांडेगाव इथं तवेरा गाडीचा अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यु झाला. यात दीड वर्षांच्या मुलाचा देखील समावेश आहे. तर पाच ते सहा प्रवासी या अपघातात जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ गोंदिया इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

तिरोडा तालुक्यातील करटी बुजूर्ग इथं लग्न समारंभानिमित्त वऱ्हाडी तवेरा गाडीने गोंदिया तालुक्यातील जुनेवाणी इथं जात होते. यावेळी दांडेगावच्या चौकात ही घटना घडली. या घटनेची पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. त्यानंतर गंगाझरी पोलीस घटना स्थळी झाले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत आहेत.

अपघातांच्या संख्येत वाढ

कालही असाच भीषण अपघात झाला होता. बसमध्ये खचाखच प्रवासी भरून शेगाव स्थानकातून जळगाव जामोदकडे जाणार्‍या एसटी बसचे कालखेड फाट्याजवळ ऍक्सल तुटून अपघात झाल्याची घटना घडली. एक्सलेटर तुटल्याने बसची मागची दोन्ही चाकं निखळून बाहेर पडली. मात्र , अशा परिस्थितीतही सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही. बसमध्ये 90 ते 100 प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. एस टी बस प्रवाशांनी खचाखच भरून शेगांववरून जळगाव जामोदकडे निघाली होती. तेव्हा असता वाटेत कालखेड फाट्याच्या जवळ पोहोचल्यानंतर अचानक बसचं एक्सलेटर तुटलं. यामुळे अपघात झाला.

Non Stop LIVE Update
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर.
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला.
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले...
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले....
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर.
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप...
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप....
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज.
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक.
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा.
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ.
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.