गोंदियात शिवशाही बसचा भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू, मृत प्रवाशांच्या नावाची यादी समोर
गोंदिया जिल्ह्यातल्या सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी परिसरात शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाला असून, मृत प्रवाशांच्या नावाची यादी समोर आली आहे.
गोंदिया जिल्ह्यातल्या सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी परिसरात शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. ही बस नागपूरहून गोंदियाकडे येत होती. बस उलटून हा अपघात झाला. या अपघातात मोठी जीवितहानी झाली आहे. मृतांचा आकडा वाढला असून, बारा पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सडक अर्जुनी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. ज्या बसचा अपघात झाला त्या बसमधून 40 ते 45 प्रवासी प्रवास करत होते, त्यापैकी बारा जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या प्रवाशांची ओळख पटली असून यादी समोर आली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात झालेल्या शिवशाही बस अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक महिला पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे. या अपघातामध्ये एकूण 29 जण जखमी झाले आहेत. जखमींवर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. अपघातात मृत्यू झालेल्या बारा प्रवाशांपैकी 9 जणांची ओळख पटली असून, अद्याप तीन प्रवाशांची ओळख पटलेली नाहीये.
मृतांची नावं
1) स्मिता सूर्यवंशी (32) रा. मोरगाव अर्जुनी (पोलीस कर्मचारी)
2) मंगला राजेश लांजेवार (60) राहणार पिपरी जिल्हा भंडारा
3) राजेश देवराम लांजेवार राहणार पिपरी जिल्हा भंडारा
4) कल्पना रविशंकर वानखेडे (65) राहणार वरोरा जिल्हा चंद्रपूर
5) रामचंद्र कनोजे (65) राहणार चांदोरी साकोली जिल्हा भंडारा
6) अंजिरा रामचंद्र रामचंद्र कनोजे (60) राहणार चांदोरी साकोली जिल्हा भंडारा
7) आरिफ अजहर सय्यद (42) राहणार घोटी गोरेगाव गोंदिया
8) अजहर अली सय्यद (55) राहणार घोटी गोरेगाव गोंदिया
9) नयना विशाल मिटकरी (35) राहणार बेसा जिल्हा नागपूर
10) अनोळखी पुरुष
11) अनोळखी पुरुष
12)अनोळखी