तिचा नकार जिव्हारी लागला, तरूण थेट मोबाईल टॉवरवरच चढला ; कुठे घडला हा थरारक प्रसंग ?

प्रेमात आंधळ्या युवकाने पुढे-मागे काहीच न पाहता जे कृत्य केलं त्याने अख्खं गाव हादरलं. प्रेमात आंधळा होऊन तो स्वत:चं आयुष्य संपवणार होता. आणि त्यासाठी कारण काय तर त्याचं ज्या तरूणीवर प्रेम होतं तिने त्याला नकार दिला.

तिचा नकार जिव्हारी लागला, तरूण थेट मोबाईल टॉवरवरच चढला ; कुठे घडला हा थरारक प्रसंग ?
Follow us
| Updated on: Nov 22, 2023 | 1:22 PM

शाहिद पठाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, गोंदिया | 22 नोव्हेंबर 2023 : प्रेमात माणूस आंधळा होतो असं म्हणतात. म्हणजे अगदी खराखुरा नव्हे पण सारासार विचार करण्याची त्याची बुद्धी कमी होते. पुढचा मागचा काहीच विचार करत नाही. फक्त प्रेम एके प्रेमच.. अशाच एका प्रेमात आंधळ्या युवकाने पुढे-मागे काहीच न पाहता जे कृत्य केलं त्याने अख्खं गाव हादरलं. प्रेमात आंधळा होऊन तो स्वत:चं आयुष्यचं संपवणार  होता. आणि त्यासाठी कारण काय तर त्याचं ज्या तरूणीवर प्रेम होतं तिने त्याला नकार दिला. तिच्या नकारामुळे खचलेल्या त्याने थेट 300 फुट मोबाईल टॉवरवर चढण्याचा प्रयत्न केला.

अखेर पोलिसांनी कसून प्रयत्न करत त्या तरूणाला खाली उतरवून त्याचे प्राण वाचवले. पोलिसांनी या प्रकरणी अतिशय काळजीपूर्वक ही घटना हाताळणी याबद्दल नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक केले जात आहे. त्याच्या या स्टंटमुळे अनेकांना शोलेमधल्या धर्मेंद्रच्या सीनची आठवण झाली.

एका नकाराने तो खचलाच आणि थेट…

देवरी तालुक्यातील चिंचगड येथील ही घटना आहे. तेथे राहणारा दिपक कुमार रजन कुंजाम (वय 24) या तरूणाचे छत्तीसगड राज्यातील तरुणीवर प्रेम होते. त्याने तिला लग्नासाठीही विचारले, मात्र तिने त्याच्याशी लग्न करण्यास थेट नकार दिला. यामुळे तो निराश झाला आणि गावातील मोबाईल टॉवर चढून त्याने त्याचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला.

या घटनेची माहिती स्थानिकांनी चिचगड येथील पोलिसांना दिली. त्यानंतर ठाणेदार शरद पाटील व त्यांची टीम तत्काळ घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी त्या तरूणाशी मोबाईलवरू संपर्क साधला. तब्बल चार तास पोलिस त्या तरूणाची मनधरणी करत समजूत काढायचा प्रयत्न केला. पण तो तरूण कुणाचेच, काहीही ऐकत नव्हता. अखेर ठाणेदार शरद पाटील यांनी स्वत:च त्या तरूणाचे प्राण वाचवायचे ठरवले. त्यांच्या आदेशानुसार, इतर पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधत, त्याला मोबाईलवर बोलण्यात व्यस्त ठेवलं. आणि स्वत:च्या जिवाचे बरे वाईट करायचे नाही असे सांगून त्यांनी त्याला विश्वासात घेतले. त्याला आवश्यक असलेल्या इतर वस्तू जागेवर त्वरित उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिक यांच्या मदतीने त्या तरुणाला चार तासांनी टॉवरवरून खाली उतरवत त्याचा जीव वाचवला.

Non Stop LIVE Update
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ.
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?.
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले...
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले....
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट.
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका.
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.