ग्रामपंचायत राजकारणाचा फड तरुणांच्या हाती, इंजिनिअर, डॉक्टर लढवतायत निवडणूक

राजकारणात ग्रामपंचायत निवडणूक राजकारणाचा पाया मानली जाते. पुढारी होण्याची पहिली पायरी म्हणून ग्राम पंचायत निवडणुकीकडे पाहिलं जातं. महाराष्ट्रात लवकरच ग्राम पंचायतीच्या निवडणूका होणार आहेत. महत्त्वाच म्हणजे यावेळी डॉक्टर, पदवीधर ते दहावी उत्तीर्ण झालेले तरुण-तरुणी सरपंचपदाच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.

ग्रामपंचायत राजकारणाचा फड तरुणांच्या हाती, इंजिनिअर, डॉक्टर लढवतायत निवडणूक
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 02, 2023 | 1:55 PM

गोंदिया (शाहिद पठाण/किशोर पाटील/) : नवीन पिढीतील तरुण-तरुणी किमान दहावी उत्तीर्ण तसेच पदवी पदव्युत्तर झालेले आहेत. त्याचे प्रतिबिंब भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात होत असलेल्या 57 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दिसून आले आहे. अधिकतर उमेदवार दहावी उत्तीर्ण ते पदवीपर्यंत शिक्षण झालेले आहेत. ते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. राजकारणात आपल्याला सगळ्यात जास्त ज्येष्ठ नेतृत्व करणारे नेते दिसतात. त्यामुळे राजकारणाला नावे देखील ठेवली जात आहेत. हल्ली तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे हे प्रॅक्टिकलमध्ये सिद्ध होत आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तरुण सक्रिय सहभाग घेतला आहे. याआधी चौथी पास, सातवी पास असे येत होते. ग्रामपंचायत हा गावविकासाचा पाया आहे. प्रत्येक तरुणाने एक दृष्टिकोन घेऊन उतरले पाहिजे. इंजिनिअर, डॉक्टर, पदवीधर ते दहावी उत्तीर्ण झालेले तरुण-तरुणी सरपंचपदाच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.

मोहाडी तालुक्यात 57 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत सार्वत्रिक निवडणूक सदस्यपदासाठी 1 हजार 123 तर सरपंचपदासाठी 159 उमेदवार निवडणुकीत उभे झाले आहेत. अलीकडे मुलं व मुली किमान दहावी तरी उत्तीर्ण होत आहेत. सरपंचपदासाठी उभे झालेले अनेक उमेदवार दहावी उत्तीर्ण झाले असल्याचे दिसून आले. तसेच बरेच उमेदवार पदवीधर पदवीत्तर शिवाय इंजिनियर व डॉक्टर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उतरले आहेत. ग्रामपंचायत सरपंच उमेदवार म्हणून वय 27 ते 45 वयापर्यंत तरुण उमेदवार निवडणूक लढवत असल्याचे दिसून आले आहे. राजकारणात राहून सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच सहकार क्षेत्रात राहून पदाची चव चाखली आहे तरीही ग्रामपंचायतचे सरपंचपद बळकावण्यासाठी तरुण महिला तसेच तरुण युवक असणाऱ्या उमेदवारांच्या विरोधात काही 50 वय ते 69 या वयाच्या उमेदवारांनी दंड थोपटले आहेत. तथापी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या राजकारणाचा फड आता तरुण पुरुष- महिलांच्या हातात येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

जळगावात प्रचार जोरात

जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायतची सार्वत्रिक तसेच पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अवघ्या तीन दिवसानंतर या ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून त्यामुळे उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला असून गावोगावांमध्ये भव्य अशा प्रचारफेरीच आयोजन केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. जळगावातील नंदगाव येथे ही उमेदवाराच्या प्रचारार्थ भव्य प्रचार फेरी काढण्यात आली . प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्यासाठी कार्यकर्ते हातात छोटा ध्वनीक्षेपक घेवून त्या माध्यमातून उमेदवाराचा प्रचार केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रचारफेऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांसह त्याला ग्रामस्थांचा सहभाग असल्याचा पाहायला मिळत आहे.

रत्नागिरीत मतदान कधी?

रत्नागिरी जिल्ह्यातील 14 सार्वत्रिक ग्रामपंतायत निवडणुकीपैकी 4 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यात. त्यामुळे 10 ग्रामपंचायतीमध्ये 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

गोंदियात काय स्थिती?

जेमतेम चार दिवसांवर मतदान आल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूक असलेल्या चार तर पोटनिवडणूक असलेल्या तीन ग्रामपंचायतमध्ये निवडणुकीचा जोर वाढू लागला आहे. यामध्ये एकूण 4,690 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विशेष म्हणजे, काही ठिकाणी उमेदवारी अर्ज आले नसल्याने तर काही ठिकाणी फक्त एकच अर्ज असल्याने तेथे निवडणूक होणार नाही. परिणामी आता चार ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक, तर तीन ग्रामपंचायतींमध्ये तीन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. गोंदिया जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक तर दहा ग्रामपंचायतीमध्ये रिक्त झालेल्या सदस्यांच्या दहा जागांसाठी पोटनिवडणूक निवडणूक आयोगाने जाहीर केली होती.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....