10 वर्षांच्या मुलीच्या पोटातून काढले तब्बल अर्धा किलो केस! किती वेळ चालली शस्त्रक्रिया? वाचा

| Updated on: Dec 01, 2022 | 8:06 AM

तिच्या पोटात केस आहेत, हे कळलं कसं? वाचा गोंदियातील 10 वर्षांच्या मुलीसोबत घडलेला दुर्मिळ प्रकार

10 वर्षांच्या मुलीच्या पोटातून काढले तब्बल अर्धा किलो केस! किती वेळ चालली शस्त्रक्रिया? वाचा
10 वर्षांच्या मुलीची दुर्मिळ शस्त्रक्रिया
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

गोंदिया : लहान मुलं माती खातात, चुना खातात, भिंत खातात, खडू, राखडही खातात. पण एका मुलीने चक्क केस खाल्लेत. यातही तिने एक दोन नाही तर तब्बल अर्धा किलो पोटात आढळून आल्यानं आश्चर्य व्यक्त केला जातंय. हा प्रकार गोंदिया येथून समोर आला आहे. या मुलीची बालरोग तज्त्रांनी शस्त्रक्रिया केली आणि 10 वर्षांच्या मुलीला जीवदान दिलं आहे. अर्धा किलो केस पोटातून काढण्यासाठी डॉक्टरांना तब्बल तीन तास प्रयत्नांची शर्थ करावी लागली. 3 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांना या मुलीच्या पोटातील केस काढण्यात यश आलं.

पोटात केस! कळलं कसं?

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील 10 वर्षीय मुलीला तीन दिवसांपासून भुक न लागणे, पोट दुखणे, उलटी होणे असा त्रास होत होता. याकरीता तिच्या वडिलांनी तिला तिरोडा येथील बालरोगतज्ज्ञांना दाखविले.

डॉक्टरांनी त्या मुलीची सोनोग्राफी करायला सांगितलं. तेव्हा पोटात काहीतरी वेगळी वस्तू असल्याचे कळलं. यामुळे त्यांनी तिला पुढील उपचाराकरीता गोंदिया येथील खाजगी व्दारका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील बालरोग शल्यचिकित्सक डॉ. विभु शर्मा यांच्याकडे पाठविले.

डॉ. शर्मा यांनी मुलीची तपासणी केली, तिच्या पोटाचे सिटीस्कॅन करण्याचा सल्ला दिला. या सिटीस्कॅनदरम्यान पोटात केसांचा गुच्छा असून तो आतड्यात गुंतलेला असल्याचे लक्षात आले.

डॉक्टरांनी या मुलीच्या वडिलांकडे विचारणा केली. तेव्हा मुलींच्या वडिलांनी सांगितलं की, ती लहानपणी केस खायची. परंतु आता तिने केस खाणे बंद केले आहे, असेही सांगितले.

यावर डॉ. शर्मा यांनी त्या मुलीची शस्त्रक्रिया तातडीने करणे गरजेचे असल्याचं मुलीच्या पालकांना सांगितलं.. शस्त्रक्रिया करताना मुलीच्या जीवला पण धोका होऊ शकतो, असे डॉक्टरांनी तिच्या नातेवाईकांना सांगितले.

नातेवईकांच्या संमतीने डॉ. शर्मा यांनी डॉ. श्रद्धा शर्मा यांच्या मदतीने तब्बल तीन तास शस्त्रक्रिया केली. त्यानंतर अर्धा किलो केसांचा गुच्छा त्या मुलीच्या पोटातून काढण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर मुलीची प्रकृती बरी असून तिला लवकरच रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.