कोरोनाकाळात चमकदार कामगिरी; नाशिकमध्ये अधिकारी अन् कर्मचाऱ्यांच्या पाठीवर महासंचालकांची कौतुकाची थाप

| Updated on: Nov 03, 2021 | 3:53 PM

राज्याचे माहिती जनसंपर्क सचिव तथा महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांनी नाशिक येथे कोरोना काळात उत्कृष्ट आरोग्य संवादक म्हणून काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान केला.

कोरोनाकाळात चमकदार कामगिरी; नाशिकमध्ये अधिकारी अन् कर्मचाऱ्यांच्या पाठीवर महासंचालकांची कौतुकाची थाप
राज्याचे माहिती जनसंपर्क सचिव तथा महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांनी नाशिक येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव केला.
Follow us on

नाशिकः कोरोनाच्या आरोग्य संवादात माहिती आणि जनसंपर्कच्या टीम नाशिकने कौतुकास्पद काम केले. याकाळात विविध प्रसार माध्यमांचा सुयोग्य वापर करत पारंपरिक माध्यमांच्या व्यवस्थापनातून व्यापक जनजागृती करत आरोग्य संवादकाची भूमिका यशस्वीरित्या निभावली, असे प्रतिपादन राज्याचे माहिती जनसंपर्क सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले.

राज्याचे माहिती जनसंपर्क सचिव तथा महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांनी नाशिक येथे जिल्हा माहिती कार्यालय आणि विभागीय माहिती कार्यालयास भेट दिली. त्यावेळी कोरोना काळात उत्कृष्ट आरोग्य संवादक म्हणून काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. या कार्यक्रमाला नाशिक विभागाचे माहिती उपसंचालक ज्ञानेश्वर इगवे, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत (नाशिक), विलास बोडके (धुळे) माहिती अधिकारी तथा सहाय्यक संचालक अर्चना देशमुख, मोहिनी राणे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सचिव डॉ. पांढरपट्टे म्हणाले, आजच्या युगाचे वर्णन ‘बहुमाध्यमांचे युग’ म्हणून केला जातो. कोरोनामुळे या बहुमाध्यम संस्कृतीला डिजिटलायजेशनचे कोंदण लाभले आहे. येणाऱ्या काळात बहुमाध्यमांच्या डिजिटलायजेशनचा प्रभावदर्शक कालखंड म्हणून या कालखंडाकडे पाहिले जाईल. या बहुमाध्यमांची दृष्टी आणि भान असणारी व्यक्तीच आज माध्यम, जनसंपर्क वा संवाद क्षेत्रात यशस्वीपणे काम करू शकते. आजच्या कोरोना महामारीच्या तत्काळ संवादाच्या युगात जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात घडलेली बातमी लहानमोठ्या शहरांत लगोलग पसरते, पोहचते. त्यामुळे अत्यंत संवेदशीलतेने आणि जाणिवेने शासकीय जनसंपर्क अधिकारी कर्मचारी काम करत असल्याचे गौरवोद्गार डॉ. पांढरपट्टे यांनी काढले.

यांचा झाला सन्मान

– रणजितसिंह राजपूत, जिल्हा माहिती अधिकारी, नाशिक (आपत्तकालीन माध्यम व्यवस्थापनाबद्दल)
– अर्चना देशमुख, माहिती अधिकारी, नाशिक (कोरोना काळातील वृत्त संकलन, विशेष लेखन व माध्यम समन्वयासाठी)
– मोहिनी राणे, सहायक संचालक, नाशिक (कोरोना काळातील वृत्त संकलन व विशेष लेखन व माध्यम समन्वयासाठी)
– जयश्री कोल्हे, उपसंपादक तथा माहिती सहायक (कोरोना काळातील वृत्त संकलन व विशेष लेखन व माध्यम समन्वयासाठी)
– मनोहर पाटील, माहिती सहायक, मालेगाव (कोरोना काळात मालेगाव येथील वृत्तसंकलन व माध्यम समन्वयासाठी)
– किरण डोळस, माहिती सहायक, नाशिक (कोरोना काळात वृत्तसंकलन व माध्यम समन्वयासाठी)
– प्रवीण बावा, माहिती सहायक, नाशिक (कोरोना काळात वृत्तसंकलन व माध्यम समन्वय)
– संजय बोराळकर, प्रदर्शन सहायक (कोरोना काळात जाहिरात व्यवस्थापनाकरीता)
– श्याम माळवे, लेखापाल (कोरेना काळात वित्तीय व्यवस्थापनासाठी)

दृकश्राव्य टीम

– पांडुरंग ठाकुर, चलत छायाचित्रकार, नाशिक (कोरोना काळात व्हिडीओ संकलनासाठी)
– अतुल बाळदे, कॅमेरामन, नाशिक (कोरोना काळात मालेगावातील व्हिडीओ संकलनासाठी)
– प्रमोद जाधव, छायाचित्रकार, नाशिक (कोरोना काळात मालेगावातील छायाचित्रांचे संकलनासाठी) चलत छायाचित्रकार, कॅमेरामन व छायाचित्रकार यांच्या टिमच्यावतीने मनोज अहिरे, साऊंड रेकॉर्डिस्ट, नाशिक (कोरोना काळात छायाचित्रांचे संकलन) यांनी सन्मान स्विकारला.
– वाहनचालक राजू चौगुले, संतू ठमके (कोरोनाच्या आपत्ती काळात वाहनसेवेसाठी)

इतर बातम्याः

Special Report: तुझं हसणं माझ्या जगण्याची भाकरीय; जगात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या एका मुलखावेगळ्या कवीची गोष्ट!

Jobs: ऐन दिवाळीत गोड बातमी, सिपेट प्रकल्प नाशिकमध्ये होणार; हजारो बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार!