Jobs: ऐन दिवाळीत गोड बातमी, सिपेट प्रकल्प नाशिकमध्ये होणार; हजारो बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार!

ऐन दिवाळीत एक गोड बातमी. अखेर बहुचर्चित सिपेट प्रकल्प नाशिकमध्येच होणार असून त्यासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. या प्रकल्पामुळे नाशिकमध्ये हजारो रोजगारांची निर्मिती होणार आहे.

Jobs: ऐन दिवाळीत गोड बातमी, सिपेट प्रकल्प नाशिकमध्ये होणार; हजारो बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार!
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 3:23 PM

नाशिकः ऐन दिवाळीत एक गोड बातमी. अखेर बहुचर्चित सिपेट प्रकल्प नाशिकमध्येच होणार असून त्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. केंद्राने तत्त्वतः मान्यता दिली असून, त्यांना रितसर पुढी आठवड्यात प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे नाशिकमध्ये हजारो रोजगारांची निर्मिती होणार आहे, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

खरे तर केंद्र सरकारने पनवेल येथे हा प्रकल्प उभारायला मंजुरी दिली होती. मात्र, त्यासाठी 15 एकर जागा हवी होती. पनवेल येथे या प्रकल्पासाठी इतकी जागा मिळाली नाही. त्यामुळे हा प्रकल्प गुंडाळला जावून तो राज्याबाहेर जाण्याची भीती होती. याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांना मिळाली. त्यांनी हा प्रकल्प नाशिकमध्ये आणण्यासाठी चक्रे फिरवली. या प्रकल्पासाठी जमीन देण्याची तयारी दर्शवली. याबाबत कंपनीच्या प्रमुखांची भेट घेतली. त्यांच्यासमोर आपली बाजू मांडली. सोबतच नाशिकमध्ये हा प्रकल्प उभारावा यासाठी दिल्लीमध्ये जोर लावला. त्यांनी तत्त्वता मान्यता दिली. त्यानंतर पुन्हा एकदा राज्य सरकारडे या प्रकल्पासाठी तगादा लावला.

गोवर्धन शिवारात जागा

खासदार हेमंत गोडसे यांनी गोवर्धन शिवारातील एक जागा या प्रकल्पासाठी निश्चित केली. केंद्राच्या पथकालाही या जागेची माहिती दिली. या पथकाला ही जागा दाखवली. त्यानंतर राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला. राज्य सरकारनेही आपला वाटा उचलण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार आता केंद्र सरकार पन्नास आणि राज्य सरकार पन्नास टक्क्यांच्या निधीचा वाटा उचलणार आहे. राज्याचे सचिव सीताराम कुंटे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत गोवर्धन शिवाराच्या जागेवर मोहोर उमटवण्यात आली आहे. आता पुढील आठवड्यात या प्रकल्पाबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला जाणार आहे.

कोविड काळात आधार

सध्या कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. रोजगार निर्मिती घटली आहे, तर कुणाचे उद्योग डबघाईला आले आहेत. अशा काळात हा प्रकल्प नाशिकमध्ये येणार असल्याची बातमी येऊन धडकली आहे. या प्रकल्पाचा निश्चितीच राज्याच्या प्रगतीत मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे हजारो नोकऱ्यांच्या संधी नाशिक जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा तयार होणार आहेत.

पनवेल येथे होणारा सिपेटचा प्रकल्प गुंडाळला गेला होता. तिथे जागा मिळत नव्हती. आम्ही नाशिकला जागा देण्याची तयारी दर्शवली. केंद्र सरकार, राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. त्यानंतर दोन्ही सरकारांनी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत हा प्रकल्प नाशिकमध्येच होणार असल्याची गोड बातमी मिळाली आहे. केंद्राच्या अधिकृत मान्यतेसाठी पुढील आठवड्यात प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. – हेमंत गोडसे, खासदार

(Cipet project to be held in Nashik; Thousands of unemployed will get jobs)

इतर बातम्याः

Special Report: तुझं हसणं माझ्या जगण्याची भाकरीय; जगात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या एका मुलखावेगळ्या कवीची गोष्ट!

ऐन दिवाळीत नाशिकमध्ये 3 एसटी कर्मचाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न; बोनससह हाती फक्त साडेचार हजारांचा पगार आल्याने घेतले विष

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची शिवसेना आमदार कांदेच्या घरी भेट; नाशिकमध्ये नाना अटकळींसह शिष्टाईच्या चर्चेला उधाण

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.