Gunaratna Sadavarte : …तर मराठा समाजाच्या नोकऱ्यांना चॅलेंज करणार, गुणरत्न सदावर्तेंची मोठी घोषणा

Vilas Ghule Case : विलास घुले खुन प्रकरणी आज बीडमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी विलास घुले यांच्या पत्नीला नोकरी देण्याची मागणी केली, तसेच नोकरी न दिल्यास मराठा समाजाच्या नोकऱ्यांना चॅलेंज करणार असल्याचेही सदावर्ते यांनी म्हटले आहे.

Gunaratna Sadavarte : ...तर मराठा समाजाच्या नोकऱ्यांना चॅलेंज करणार, गुणरत्न सदावर्तेंची मोठी घोषणा
Gunratna Sadavatre on Ghule
Image Credit source: Google
| Updated on: Aug 21, 2026 | 6:31 PM

विलास घुले खुन प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलावर गुन्हा दाखल करुन अटक करावी या मागणीसाठी बीडमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. 21 जून रोजी विलास घुले यांची हत्या झाली होती. मित्र उमेश माने याच्या अनैतिक संबंधातून सुरू असलेल्या वादामुळे ही हत्या झाली होती. या प्रकरणातील 10 आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत तर यात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाचा हात असल्याचा आरोप करत आज मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही सहभाग घेतला होता. सदावर्ते यांनी या मोर्चानंतर काय म्हटले ते सविस्तर जाणून घेऊयात.

विलास घुले हत्या प्रकरणी बीडमध्ये मोर्चाचे आयोजन

विलास घुले हत्या प्रकरणी विविध मागण्यासाठी आज बीडमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातून सुरू झालेला मोर्चा बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार होता. मोर्चा निघाल्यानंतर स्टेजवर निवेदन स्वीकारण्यासाठी उपजिल्हाधिकारी आले होते. यावेळी गुणरत्न सदावर्ते आणि उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. मात्र उपजिल्हाधिकाऱ्यांनी माफी मागितल्यानंतर निवेदन सदावर्ते यांनी त्यांना निवेदन दिले.

या मोर्चानंतर गुणरत्न सदावर्तेंच्या हस्ते मयत विलास घुलेंच्या कुटुंबीयांनी उपोषण सोडले. यावेळी आठ दिवसात कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. हे उपोषण सोडल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी घुले यांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याची मागणी केली. यावेळी सदावर्ते यांनी नेमकं काय म्हटले ते जाणून घेऊयात.

तर मराठा समाजाच्या नोकऱ्यांना चॅलेंज करणार

गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की, ‘मनोज जरांगेच्या माध्यमातून व्हायरस पसरवला जातो आहे. विखे आणि इतर मराठा मंत्र्यांनी समोर येऊन याबाबत सांगावं. महसूल खातं बावनकुळे साहेबांकडे नको म्हणून प्रयत्न सुरू आहे. नॉन मराठा महसुल मंत्री नको म्हणून टेंडर देण्यात आलेलं आहे. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा किती रोल आहे माहिती नाही. यापुढे जरांगे बावनकुळ्या म्हणून अपमान केला तर एकनाथ शिंद्या… एकनाथ्या म्हणून अपमान करेल. आमचा मास्टर प्लॅन आठ दिवसांत जाहीर करू. विलास घुले यांच्या पत्नीला नोकरी दिली पाहिजे. नोकरी नाही दिली तर मराठा आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या नोकऱ्यांना आम्ही चॅलेंज करणार.’

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us