पिंपरीतून 2 लाखांचा गुटखा जप्त ; सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

| Updated on: Nov 15, 2021 | 6:01 PM

आरोपी तेजमला यांचे संत तुकाराम नगर येथे कानिफनाथ जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात एक लाख ९५ हजार १७० रुपयांचा गुटखा विक्रीसाठी ठेवला. राजेंद्र याने त्याची खोली गुटखा साठवणूक करण्यासाठी उपलब्ध करून दिली.

पिंपरीतून 2 लाखांचा गुटखा जप्त ; सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई
कूचबिहारमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा रहस्यमयरित्या मृत्यू
Follow us on

पिंपरी-  शहरात किरणा दुकानात विक्रीस ठेवण्यात आलेला तब्बल एक लाख 95 हजारांचा गुटखा नुकताच जप्त करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी तेजमल हरकचंद सुंदेचा (वय 42), राजेंद्र किसन साठे (वय 49, दोघे रा. संत तुकाराम नगर, पिंपरी)यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपी तेजमला यांचे संत तुकाराम नगर येथे कानिफनाथ जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात एक लाख 95 हजार 170 रुपयांचा गुटखा विक्रीसाठी ठेवला. राजेंद्र याने त्याची खोली गुटखा साठवणूक करण्यासाठी उपलब्ध करून दिली. तर आरोपी सागर पाटील याने गुटखा विक्रीसाठी आरोपी तेजमल याला पुरवला असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाने दिली आहे .

गोवंश सदृश्य जनावरांची कत्तल
दुसरीकडे पिंपरीतील देहूरोड परिसरात गोवंश सदृश्य जनावरांची कत्तल करून विक्री केल्याची उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी करवाई करत सद्दाम इब्राहिम कुरेशी (वय 28, रा. इंद्रायणीनगर, लोणावळा), नईम कुरेशी (रा. आंबेडकरनगर, देहूरोड) यांना ताब्यात घेतले आहे. तसेच 45 हजाराचे मांसही जप्त केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सद्दाम याने बेकायदेशीररित्या गोवंश सदृश्य जनावरांची कत्तल करत मांसाची लोणावळा ते देहूरोड अशी वाहतूक केल्याचे समोर आले आहे. याबाबत माहिती मिळाल्यांनतर देहूरोड पोलिसांनी सेंट्रल चौकात वाहनावर कारवाई केली आहे.

हेही वाचा

Pune crime |घृणास्पद घटना: 54 वर्षीय वाहन चालकाकडून गतीमंद मुलीचे लैंगिक शोषण, दोन वर्ष सुरु हा प्रकार

धक्कादायकः 12 वर्षीय मुलाने चोरले सव्वा लाख रुपये, औरंगाबादेत पेट्रोलपंपावर सीसीटीव्ही फुटेजने चोरी उघड

Ganja Seized In Jalgaon | मुंबई एनसीबीची मोठी कारवाई, जळगावातून 1500 किलो गांजा जप्त