Ganja Seized In Jalgaon | मुंबई एनसीबीची मोठी कारवाई, जळगावातून 1500 किलो गांजा जप्त

राज्यात सध्या ड्रग्ज (Drugs) विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या जात आहेत. यादरम्यान आता मुंबई (Mumbai) एनसीबीच्या (NCB) पथकाने जळगावात (Jalgaon) एक मोठी कारवाई करत तब्बल 1500 किलो गांजा जप्त केला आहे. एनसीबीच्या पथाकाने यावेळी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरु आहे.

Ganja Seized In Jalgaon | मुंबई एनसीबीची मोठी कारवाई, जळगावातून 1500 किलो गांजा जप्त
ganja seized in Jalgaon

मुंबई : राज्यात सध्या ड्रग्ज (Drugs) विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या जात आहेत. यादरम्यान आता मुंबई (Mumbai) एनसीबीच्या (NCB) पथकाने जळगावात (Jalgaon) एक मोठी कारवाई करत तब्बल 1500 किलो गांजा जप्त केला आहे. एनसीबीच्या पथाकाने यावेळी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरु आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रतील जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ एनसीबीच्या पथकाने तब्बल 1500 किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी एनसीबीने दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हा गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आणला जात होता.

महाराष्ट्रासह मुबंईत सध्या मोठ्या प्रमाणात एनसीबीकडून कारवाया केल्या जात आहेत. यादरम्यान, एनसीबीने अनेक ड्रग्ज पॅडलर्सच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर, बॉलिवूडशी संबंधित अनेकांवरही एनसीबीकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील ड्रग्ज पॅडलर्समध्ये धाकधूक वाढली आहे.

औरंगाबादेत माजी नगरसेवकाच्या भावाच्या गाडीत नशेच्या 260 गोळ्या

काहीच दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरातील माजी नगरसेवक सय्यद मतीन (Sayyad Matin) यांच्या भावाची गाडी घेऊन जाणाऱ्या एका इसमाकडे नशेच्या 260 गोळ्या (बटण) आढळून आल्या होत्या. गुरुवारी (11 नोव्हेंबर) शहरातील सिटी चौक पोलिसांनी (City Chauk Police station) अण्णा भाऊ साठे चौकात रात्री साठेआठ वाजता ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी सय्यज मंजूर (Sayyad Manjoor) या आरोपीला अटक केली आहे.

खबरींनी दिलेल्या माहितीवरून कारवाई

आरोपी कारमधून नशेच्या गोळ्या घेून जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना गुरुवारी मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे, अंमलदार देशराज मोरे यांच्या पथकाने अण्णा भाऊ साठे चौकात सापळा रचून गाडी अडवली. सय्यद मंजूरची तपासणी केली असता 13 स्ट्रीपमध्ये 260 गोळ्या आढळून आल्या.

संबंधित बातम्या :

Pune crime |घृणास्पद घटना: 54 वर्षीय वाहन चालकाकडून गतीमंद मुलीचे लैंगिक शोषण, दोन वर्ष सुरु हा प्रकार

जळगावमध्ये अज्ञात कारणावरुन तरुणाची गळफास घेत आत्महत्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI