AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावमध्ये अज्ञात कारणावरुन तरुणाची गळफास घेत आत्महत्या

सायंकाळी सहा वाजता सूरजचा मोठा भाऊ मुकेश कंगार घरी आला असता त्याने दरवाजा उघडून पाहिले असता सूरज गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकताना दिसला. मुकेशने शेजाऱ्यांच्या मदतीने तात्काळ सूरजला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

जळगावमध्ये अज्ञात कारणावरुन तरुणाची गळफास घेत आत्महत्या
आत्महत्या प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 1:56 AM
Share

जळगाव : अज्ञात कारणावरुन एका 24 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी जळगावमधील रामेश्वर कॉलनीमध्ये घडली आहे. सूरज हरी कंगार असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तरुणाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकले नाही. दरम्यान यासंदर्भात पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

कुटुंब नातेवाईकाच्या उत्तरकार्यासाठी गेले असताना केली आत्महत्या

सूरज हा रामेश्वर कॉलनीतील स्वामी समर्थ मंदिराजवळ आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याच्या घरी आई, वडील, मोठा भाऊ, वहिनी असा परिवार आहे. सूरज एमआयडीसीमध्ये एका कंपनीत कामाला होता. रविवारी सुट्टी असल्याने तो घरीच होता. वरणगाव येथे एका नातेवाईकाचे निधन झाले होते. त्यांच्या उत्तरकार्यासाठी सूरजच्या घरातील सर्व मंडळी वरणगावला गेली होती. घरी सूरज एकटाच होता. यावेळी घरी कुणी नसताना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सूरजने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मोठा भाऊ घरी आल्यानंतर घटना उघडकीस

सायंकाळी सहा वाजता सूरजचा मोठा भाऊ मुकेश कंगार घरी आला असता त्याने दरवाजा उघडून पाहिले असता सूरज गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकताना दिसला. मुकेशने शेजाऱ्यांच्या मदतीने तात्काळ सूरजला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान सूरजने आत्महत्या का केली असावी याबाबत पोलीस तपास करीत आहेत. (Youth commits suicide by strangulation in Jalgaon for unknown reasons)

इतर बातम्या

आधी बलात्कार, कृत्य उघडकीस येईल म्हणून हत्या, मृतदेह फ्रीजमध्ये लपवला, वाचा अल्पवयीन मुलासोबत काय घडले?

बिलासपूर : अल्पवयीन पालकांनीच नवजात बालकाला झुडुपात फेकले, पोलीस तपासात प्रकरणाचा उलगडा

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.