शुद्ध सोने मिळणारी सुवर्णनगरी म्हणून ख्याती असलेला जिल्हा जळगाव. पूर्वी या भागाला पूर्व खानदेश असेही नाव होते. जिल्ह्यातील केळीदेखील देश-विदेशात प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे ठिबक सिंचन पद्धतीवर पिकवली जाणारी केळी आणि कापसाची शेती ही संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी आदर्श उदाहरण आहे. भारतातील सर्वाधिक केळी उत्पादक जिल्हा म्हणून जळगावची ख्याती आहे. येथील जिनिंग व प्रेसिंग, साखर कारखाने, रेशीम कापडनिर्मितीसह वरणगाव व भुसावळ येथील युद्धसाहित्य निर्मिती, अन्नप्रक्रिया उद्योग प्रसिद्ध आहे. जळगावचे क्षेत्रफळ 11,700 चौरस किलोमीटर असून येथील लोकसंख्या 3 कोटी 67 लाख 9,936 एवढी आहे. जिल्ह्यात एकूण 15 तालुके असून त्यात अंमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा, जळगाव तालुका, मुक्ताईनगर, जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा, बोदवड, भडगाव, भुसावळ, यावल व रावेर अशी आहेत. जळगाव जिल्ह्यात एक महापालिका असून 13 नगरपालिका आहेत. जिल्ह्यात 15 पंचायत समित्या आहेत. जळगावमध्ये एक लोकसभा मतदार संघ तर सहा विधानसभा मतदार संघ आहे. यात जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा या विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो. महाराष्ट्राच्या राजकारणात जळगावचे महत्त्व असून भारताच्या इतिहासातील पहिल्या स्त्री राष्ट्रपती प्रतिभा पाटील यादेखील जळगाव जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यात खास बोलली जाणारी अहिराणी ही बोली भाषा प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी या जळगाव जिल्ह्यातील होत्या. बहिणाबाईंच्या स्मरणार्थ जळगाव येथील विद्यापीठाचे नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ठेवण्यात आले. बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे हेदेखील जळगाव जिल्ह्यातील होते.
जळगाव जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.
जळगावः शहरात एक अनोखा विवाह समारंभ (Wedding ceremony) पार पडलं आहे. लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात अस बोललं जातं. याचाच प्रत्यय जळगावमध्ये आला आहे. ...
खजुराच्या शेतीचा प्रयोग हे नगण्य शेतकरीच करतात. कारण ही शेती पध्दत खर्चिक तर आहेच पण याबाबत अधिकची माहिती कुणाला नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी आखाती ...
मागील आठ महिन्यांपासून महासभेत मंजुरी मिळूनदेखील अद्याप हा प्रकल्प सुरू झालेला नाही. आता हा प्रकल्प जणू थंड बस्त्यातचं पडून असल्याचे चित्र मनपात दिसून येत आहे. ...
महिला कार्यकर्त्यावर हात उचलला गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे चांगल्याच भडकल्याचं पाहायला मिळालं. 'यापुढे महाराष्ट्रात कुठल्याही पुरुषाने कुठल्याही पक्षातील महिलेवर हात उगारला तर हात ...
आनंद दिघे यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत या उद्देशातून हा सिनेमा दाखवण्यात आला. या चित्रपटाच्या माध्यमातून शिवसेना घराघरात पोहोचेल आणि ग्रामीण भागातही सेनेचे बळकटीकरण होईल, असा ...
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील एका गावात 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गल्लीतील मैत्रीणीसोबत ती बोलत होती. त्यानंतर मात्र ती अचानक गायब झाली. ...