Gold And Silver Price Today: आरारारा खतरनाक, एकाच दिवसात 12 हजारांची वाढ, मोडले सर्व रेकॉर्ड,सोने-चांदीच्या ताज्या भावाने अंगावर काटा
Jalgaon Sarafa Market: जळगाव सराफा बाजारात एकाच दिवशी 12,000 रुपयांची सुसाट वाढ दिसून आली. ग्राहकांनी सकाळी सकाळी गर्दी केली. पण भाव पाहताच अनेकांची बोबडी वळाली. आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. काय आहेत आज सोने आणि चांदीचा भाव? जाणून घ्या...

किशोर पाटील/ प्रतिनिधी/ जळगाव: जळगावातील सराफ बाजारात चांदीच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ झाली आहे.गेल्या 24 तासात चांदीच्या दरात तब्बल 12 हजार रुपयांची वाढ झाली आहे.चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 28 हजार 660 रुपयांच्या ऐतिहासिक विक्रमी उच्चांकीवर पोहोचले. सोन्याच्या दरात देखील 700 रूपयांची वाढ झाली जीएसटीसह सोन्याचे दर 1 लाख 40 हजार 801 रुपयांच्या विक्रमी उच्चांकीवर पोहोचले. सोन्या आणि चांदीच्या दरात (Gold And Silver Price Today) सलग तिसऱ्या दिवशी दरवाढ सुरूच आहे.या दरवाढीने ऐन थंडीत ग्राहक घामाघूम झाला आहे.
यावर्षात सोने आणि चांदीच्या किंमतीत चढउतार दिसून आला. नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोने अजून रेकॉर्ड मोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशातील बाजारात 24 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 380 रुपयांनी वधारला. सोने प्रति 10 ग्रॅम 1,38,930 रुपयांवर आले आहे. काल हाच भाव प्रति 10 ग्रॅम 1,38,550 रुपये इतका आहे. चांदीत तर बम्पर वाढ झाली आहे. एका किलोमागे चांदी देशातील बाजारात 10 हजारांची वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव 2,33,000 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनकडून (IBJA) सोने आणि चांदीचा भाव जाहीर झाला आहे. 24 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोने 1,36,635 रुपये, 23 कॅरेट 1,36,088, 22 कॅरेट सोने 1,25,158 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 1,02,476 रुपये, 14 कॅरेट सोने 79,931 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 2,18,954 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
नवीन वर्षात 16 टक्क्यांपर्यंतची वाढ
यंदा घरगुती बाजारात सोन्याच्या किंमतीत आतापर्यंत 67 टक्के वाढ दिसून आली आहे. जागतिक परिस्थिती, रुपये आणि डॉलरच्या किंमतीत असाच लपंडाव दिसला. अथवा रुपयात अधिक घसरण झाली तर 2026 मध्ये सोन्याच्या किंमतीत 5 टक्के तर 16 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीत यंदा आतापर्यंत 60 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे लंडन बुलियन मार्केट असोसिएशनच्या आकडेवारीनुसार दिसून येत असल्याची माहिती मनीकंट्रोलने दिली आहे.
