AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांना भाजप, शिवसेना शिंदे गटाचा मोठा धक्का, माहायुतीच्या गोटात वेगवान घडामोडी

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठी बातमी समोर आली असून, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला भाजप आणि शिवसेना शिंदे गटानं मोठा धक्का दिला आहे.

अजितदादांना भाजप, शिवसेना शिंदे गटाचा मोठा धक्का, माहायुतीच्या गोटात वेगवान घडामोडी
महायुती Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 25, 2025 | 4:57 PM
Share

राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणुकांची देखील घोषणा झाली आहे. महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजताच सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, दरम्यान नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीमध्ये महायुतीने युतीचा जो पॅटर्न ठेवला होता, तोच पॅटर्न पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीमध्ये देखील कायम ठेवला जाण्याची शक्यात आहे. अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती होणार आहे, तर काही ठिकाणी भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची देखील युती होऊ शकते. तर काही ठिकाणी हे तीनही पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता आहे.

दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता जळगावमधून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे  जळगाव महापालिका निवडणुकीत काल भाजप आणि शिवसेनेकडून युती जाहीर करण्यात आली आहे. मात्र ही युती जाहीर होत असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाला लांब ठेवत डावल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बैठकीसाठी आम्हाला बोलावले नाही, का बोलावले नाही माहिती नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यानी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

मात्र दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेची बैठक झाल्यानंतर रात्री उशिरा भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी भेट घेऊन चर्चा केल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे. महायुतीत राष्ट्रवादी 26 जागांवर ठाम आहे,  12 जागांवर तडजोड करू, त्यापेक्षा कमी जागा लढणार नाही, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. सन्मानकारक जागा मिळाल्या नाही तर राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गटासोबत जाऊ असा इशाराही यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिला आहे.  दरम्यान त्यामुळे आता जळगावमध्ये काय होणार? भाजप आणि शिवसेना यांचीच युती होणार की तीनही पक्ष एकत्र लढणार? अजित पवार गट शिवसेन ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युती करणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?