AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना राजकीय पक्षाकडून आता थेट अध्यक्षपदाची ऑफर, राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार?

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आता थेट राजकीय पक्षाकडून अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे, त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना राजकीय पक्षाकडून आता थेट अध्यक्षपदाची ऑफर, राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार?
मनोज जरांगे पाटीलImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 12, 2025 | 6:32 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी अनेकदा उपोषण केलं, अखेर मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनानंतर आता मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला, सरकारने राज्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅझेटला परवानगी दिली. राज्यात हैदराबाद गॅझेट लागू झाल्यामुळे राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा संघर्ष वाढताना दिसत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे. दरम्यान हे सर्व सुरू असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना आता थेट राजकीय पक्षाकडून अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे.

स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आता थेट आपल्या पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर दिली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन दिलं  होतं.  तुमच्यासारख्या चांगल्या व्यक्तिमत्त्वाची सर्व समाजाच्या घटकांना गरज असल्याचं देखील मी त्यांना म्हटलं होतं.   महाराष्ट्राच्या 18 पगड जातीला तुमची गरज आहे, अशी माझी त्यांना विनंती असून स्वराज्य शक्ती सेनेचे अध्यक्षपद द्यायला मी त्यांना तयार आहे, असं यावेळी करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,  धनंजय मुंडे नव्हे तर मी गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा घेऊन पुढे जात आहे, तो माझ्याकडे आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे काय करतायेत हे तुम्ही सर्व बघत आहात. गोपीनाथ मुंडे यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र सायकलवर फिरून संघर्ष केला, त्याच पद्धतीने मी एकटी महिला असून देखील महाराष्ट्र फिरते आहे. वाल्मीक कराड प्रकरणामध्ये आमच्या पूर्ण घराण्याची आणि आमच्या कुळाची बदनामी झाली आहे. असंही यावेळी करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी भाजपावर देखील जोरदार टीका केली आहे.

Follow Us
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.