AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एप्रिल फूल नका समजू… हे खरंच आहे… एप्रिल महिन्यात 8-10 दिवस नव्हे तर इतक्या दिवस बँका राहणार बंद; तारखा लगेच पाहा

एप्रिल महिन्याला सुरूवात झाली आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले. मात्र, याच महिन्यात बँका तब्बल 14 दिवस बंद राहणार आहेत. यामध्ये विविध सुट्ट्या आणि रविवार आणि शनिवार यांचाही समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊयात नक्की कधी बँका बंद राहणार आहेत.

एप्रिल फूल नका समजू... हे खरंच आहे... एप्रिल महिन्यात 8-10 दिवस नव्हे तर इतक्या दिवस बँका राहणार बंद; तारखा लगेच पाहा
Bank
| Updated on: Apr 02, 2026 | 1:17 PM
Share

जर तुमचे काही बँकेत काम असतील तर फटाफट करून घ्या. कारण या एप्रिल महिन्यात बँका तब्बल 14 दिवस बंद असतील. होय तुम्ही अगदी खरे ऐकले. एप्रिल महिन्यात विविध सण आणि सुट्ट्या पकडून बँका 14 दिवस बंद राहतील. यामध्ये दुसरा आणि चाैथा शनिवार देखील समाविष्ट आहे. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरूवात झाली. एप्रिल महिन्यात विविध सणावारामुळे 8 दिवस बँका बंद असतील तर 4 रविवार आणि दुसरा आणि चाैथा शनिवार मिळून 14 दिवस बँका बंद राहतील. 1 एप्रिल रोजीही बँका बंद होत्या, म्हणजे त्यांचा ग्राहक व्यवहार यादिवशी होत नाही. 2 एप्रिल माैंडी थर्सडे निमित्त कोची आणि तिरूवनंतपुरम, 3 एप्रिल गुड फायडे सुट्टी ही सुट्टी सर्वच शहरातील बँकाना नसते. मुंबई, दिल्ली, भोपाळ, बंगलुरू, पटना या शहरांमध्ये.

5 एप्रिल रविवार. 11 एप्रिल रोजी दुसरा शनिवारी, 12 एप्रिल रोजी रविवार. त्यानंतर लगेचच 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सुट्टी, 15 एप्रिल रोजी बैसाखीची सुट्टी, 16 एप्रिल रोजी बोहाग ( गुवाहाटी), 19 एप्रिल रोजी रविवार, 20 एप्रिल बसव जयंती, 21 एप्रिल रोजी अक्षय तृतीया बंगलुरू, अगरताळा गारिया पूजा 22 एप्रिल. चाैथा शनिवार 25 एप्रिल आणि 26 एप्रिल रोजी रविवार.

यामुळेच जर तुमचे काही बँकांमध्ये महत्वाचे कामे असतील तर फटाफट करून घ्या. कारण एका मागून एक सुट्ट्या येत असल्याने आर्थिक कामे अडकण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात विविध सणवार आल्याने या सुट्ट्या आल्या आहेत.मात्र, याचा फटका ग्राहकांना बसण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक काम अडकू शकतात.

जर तुमची काही कामे अडकली असतील तर लगेचच बँकांमध्ये जाऊन पूर्ण करा. आजकाल मोठ्या प्रमाणात ऑनलाईन व्यवहार केले जात असल्याने प्रत्येक गोष्टीसाठी पूर्वीसारखे बँकांमध्ये जाण्याची तशी गरज पडत नाही. बँका नक्की कधी बंद राहणार आहेत, याच्या सविस्तर तारखा वरती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे व्यवस्थित तारखा चेक करूनच बँकेत काही काम असेल तर जा.

Follow Us
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....