AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अश्लील साइट्सपर्यंत पोहोचले अशोक खरात प्रकरणाचे व्हिडीओ; पीडितेची ‘वर्क फ्रॉम होम’ची मागणी

सबंध महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या आणि महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक झालेल्या भोंदू बाबा अशोक खरातप्रकरणामुळे पीडितांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढल्या आहेत. व्हायरल व्हिडीओमुळे महिलांना समस्यांचा सामना करावा लागतोय.

अश्लील साइट्सपर्यंत पोहोचले अशोक खरात प्रकरणाचे व्हिडीओ; पीडितेची 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी
Ashok KharatImage Credit source: Tv9
| Updated on: Apr 02, 2026 | 1:02 PM
Share

आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या आणि महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातचे व्हिडीओ लीक झाल्याने अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. अशोक खरातचा एका महिलेसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पीडित महिलेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पीडितांच्या कुटुंबीयांना घराबाहेर पडणंही कठीण झालं आहे. इतकंच नव्हे तर पीडित महिला आणि तिच्या कुटुंबातील सदस्य यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करावं लागत असल्याची माहिती समोर येत आहे. खरातप्रकरणाशी संबंधित क्लिप्स व्हायरल होऊ नयेत यासाठी सरकारने उपाययोजना करूनही पीडित महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.

पीडित महिलेच्या एका नातेवाईकाने असंही सांगितलं आहे की, क्लिप्स ऑनलाइन समोर आल्यानंतर त्यांना घरून काम करण्याची परवानगी मिळावी यासाठी ऑफिसमध्ये विनंती करावी लागली. ‘इंडिया टुडे’शी बोलताना पीडितेच्या चुलत भावाने सांगितलं, “असं काही घडेल याची आम्ही कल्पनासुद्धा केली नव्हती. आम्ही खूप अस्वस्थ झालो आहोत. मी सात दिवसांसाठी ऑफिसला जाणं टाळलं आहे. आता हे प्रकरण सुटेपर्यंत घरून काम करण्याची विनंती केली आहे.”

एका महिलेच्या तक्रारीच्या आधारे नाशिक गुन्हे शाखेनं 17 मार्च रोजी अशोक खरातला अटक केली होती. खरातने विधी आणि दैवी शक्तींचा दावा करत लैंगिक शोषण केल्याचा आरोप 35 वर्षीय विवाहित महिलेनं केला होता. अशोक खरातने तिला गुंगीचं औषध देऊन संमोहित केलं. नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 दरम्यान त्याने तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. या आरोपांनंतर नाशिक पोलिसांनी अशोक खरातविरुद्ध ही कारवाई केली. खरातवर असाही आरोप आहे की महिलांचं लैंगिक शोषण करण्यासाठी त्यांना संमोहन आणि त्यानंतर गर्भपाताची औषधं देण्यात आली होती. एसआयटीला संशय आहे की नाशिकमधील काही डॉक्टर खरातला यासाठी मदत करत होते.

या क्लिप्स व्हायरल झाल्यामुळे पीडितांच्या कुटुंबीयांना केवळ मानसिक धक्काच पोहोचत नाहीये तर संभाव्य साक्षीदारांना पुढे येण्यापासून परावृत्त केलं जात असल्याचं अधिकारी म्हणत आहेत. यामुळे तपास प्रक्रियेतही अडथळा निर्माण होत आहे. अशोक खरात प्रकरणाशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तपासकर्त्यांच्या मते, हे व्हिडीओ पॉर्नोग्राफिक वेबसाइट्सवरही पोहोचले आहेत. एसआयटीच्या मते, हे व्हिडीओ 170 वेबसाइट्सवरून हटवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा प्रकारच्या कंटेंटं प्रसारण करताना मार्गदर्शक तत्त्वांचं पालन न करणाऱ्या मीडिया प्लॅटफॉर्मवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात अनेक वृत्तवाहिन्यांनाही नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

एसआयटीने खरातचा आलिशान बंगला आणि ईशनेश्वर मंदिर असलेलं फार्महाऊस पूर्णपणे सील केलं आहे. छाप्यादरम्यान खरातचे 100 हून अधिक संशयास्पद व्हिडीओ जप्त करण्यात आले आहेत. खरातची पोलीस कोठडीत असताना एचआयव्ही चाचणी करण्यात आली होती, ज्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच