AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cooking Tips : फक्त 15 मिनिटांत घरातच तयार होईल ‘पिझ्झा बेस’, सोप्या टिप्सचा करा वापर

Cooking Tips : अनेक जण बाहेरुन पिझ्झा बेस आणतात आणि घरी पिझ्झा बनवतात. पण तुम्ही घरीच पिझ्झा बेस तुम्ही तयार करु शकता... घरी पिझ्झा बेस तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त 15 मिनिटं लागतील... तर जाणून घ्या कसा बनवाल पिझ्झा बेस...

Cooking Tips : फक्त 15 मिनिटांत घरातच तयार होईल 'पिझ्झा बेस', सोप्या टिप्सचा करा वापर
| Updated on: Nov 24, 2026 | 3:56 PM
Share

Cooking Tips : बाहेर पिझ्झा बेस कसे बनवत असतील आपल्याला माहिती नाही. पिझ्झा खाण्याची इच्छा झाल्यानंतर अनेक जण घरीत पिझ्झा बनवतात. पण पिझ्झा बेस बाहेरून आणतात. बाहेरुन आणलेले ब्रेड ताजे नसतात, ते किती दिवसांपूर्वी तयार केले असतील हे देखील आपल्याला माहिती नसतं. सांगायचं झालं तर, बाजारात तयार पिझ्झा बेस सहज मिळतात, पण त्यात तो ताजेपणा नसतो आणि ते तितके मऊही नसतात. तुम्ही घरीच बेकिंग पावडर वापरून, ॲक्टिव्ह यीस्टसह किंवा त्याशिवाय, फक्त 15 मिनिटांत पिझ्झा बेस सहज तयार करू शकता. तर जाणून घ्या झटपट कसा बनवाल पिझ्झा बेस…

पिझ्झा बेस कसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य…

२ ½ कप पीठ, ३ चमचे बेकिंग पावडर, २ मोठे चमचे पाणी. १ मोठा चमचा ऑलिव्ह तेल, चवीनुसार मीठ.. हे साहित्य काठून एका बाजूला ठेवा… त्यानंतर एका भांड्यात मैदा, बेकिंग पावडर आणि मीठ चांगले मिसळून बाजूला ठेवा. एका वेगळ्या जगमध्ये पाणी आणि ऑलिव्ह तेल मिसळा.

आता हे पाणी पिठाच्या मिश्रणात हळूहळू घाला, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे, सर्व पाणी एकदम घालू नका. पिठाचा गोळा तयार होईपर्यंत ते हाताने किंवा मोठ्या चमच्याने मळत राहा. मळलेले पीठ घट्ट वाटल्यास त्यावर थोडे पाणी शिंपडा.

आता त्याचे दोन गोळे बनवा आणि लाटण्याच्या साहाय्याने १२ इंच लांबीपर्यंत लाटा. हा बेस मोठ्या पिझ्झा किंवा बेकिंग ट्रेवर ठेवा, त्यावर तुमचा आवडता सॉस पसरवा, टॉपिंग्ज घाला आणि १५ ते १७ मिनिटे बेक करा.

पिझ्झा बेस बनवण्याची आखणी एक पद्धत

२ कप पीठ, १ टीस्पून सुके यीस्ट, १ चमचा साखर, १ मोठा चमचा ऑलिव्ह तेल, चवीनुसार मीठ… हे सर्व साहित्य काठून एका बाजूला ठेवा… सांगायचं झालं तर, पीठ फुगवण्यासाठी आणि मऊ पोत व चव देण्यासाठी यीस्ट वापरले जाते. एका लहान वाटीत कोरडे यीस्ट, २ मोठे चमचे कोमट पाणी आणि साखर एकत्र मिसळा, झाकून ठेवा आणि ५ मिनिटे तसेच राहू द्या.

आता एका मोठ्या भांड्यात पीठ, यीस्टचे मिश्रण, ऑलिव्ह तेल आणि मीठ एकत्र करा आणि पाणी घालून चांगले मळून घ्या. हे बांधलेले पीठ एका पातळ कापडाने झाकून १ ते दीड तास ठेवा. नंतर त्याचे ३ समान भाग करा आणि कोरड्या पिठाच्या साहाय्याने ७ इंच लांबीपर्यंत लाटा. आता दुमडलेले तीन पिझ्झा बेस बेकिंग ट्रेवर ठेवा आणि १८० अंश सेल्सिअस तापमानावर ५ मिनिटे बेक करा. ओव्हन आधीच गरम करायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही पिझ्झा बेस तयार करु शकता.

Follow Us
देवराम लांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; राज ठाकरेंच्या उल्लेखाने..
देवराम लांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; राज ठाकरेंच्या उल्लेखाने मनसे आक्रमक
पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! भाजप-अकाली दलाची युती, मुख्यमंत्रीपद
पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! भाजप-अकाली दलाची युती, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?
रोहित पवार त्यांच्याच पक्षातच एकटे पडले; प्रताप सरनाईकांचा खोचक टोला
Pratap Sarnaik on Rohit Pawar : रोहित पवार त्यांच्याच पक्षातच एकटे पडले; प्रताप सरनाईकांचा खोचक टोला
ठाकरे गटाचे नेते शिंदेंच्या बैठकीत, उदय सामंतांच्या सूचक विधानाने...
ठाकरे गटाचे नेते शिंदेंच्या बैठकीत, उदय सामंतांच्या सूचक विधानाने चर्चांना उधाण!
आठवडाभरात कांद्याचे दर क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; लासलगावमध्ये...
Onion Price Crash : आठवडाभरात कांद्याचे दर क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; लासलगावमध्ये शेतकऱ्यांची चिंता वाढली
मुंबईत पुस्तकांचा महासोहळा! 650 स्टॉल्सवर लाखो पुस्तके...
मुंबईत पुस्तकांचा महासोहळा! 650 स्टॉल्सवर लाखो पुस्तके, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
मनोज जरांगेंविरोधात तक्रार देण्यासाठी अजय बारस्कर पोलीस ठाण्यात....
Manoj Jarange Case : मनोज जरांगेंविरोधात तक्रार देण्यासाठी अजय बारस्कर पोलीस ठाण्यात; पेन ड्राइव्हमधील पुराव्याने खळबळ
रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार? परिणय फुके यांचा मोठा दावा!
Parinay Fuke : रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार? परिणय फुके यांचा मोठा दावा!
जळगावमध्ये सोनं तोळ्यामागे एवढ्या रुपयांनी महाग; चांदीतही....
Gold Silver Price Today : जळगावमध्ये सोनं तोळ्यामागे एवढ्या रुपयांनी महाग; चांदीतही 2000 रुपयांची वाढ VIDEO बघाच
शरद पवार स्वतःहून NDA मध्ये जातील, असं वाटत नाही-भुजबळ
Chhagan Bhujbal : शरद पवार स्वतःहून NDA मध्ये जातील, असं वाटत नाही-भुजबळ