AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकणात मोठा राजकीय भूकंप होणार? ठाकरे गटाचा बडा नेता शिंदेंच्या बैठकीला, काय घडतंय?

गराध्यक्ष झाल्यापासून मी विकासकामांचा धडाका लावलेला आहे.मी कोणताही प्रवेश केला नाही. मी प्रवेश करणार त्यावेळी जाहीरपणे सांगेल. पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली शहरासाठी वीस लाख रुपये निधी दिला, असं विधान पारकर यांनी केलं.

कोकणात मोठा राजकीय भूकंप होणार? ठाकरे गटाचा बडा नेता शिंदेंच्या बैठकीला, काय घडतंय?
uddhav thackeray and eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 24, 2026 | 3:54 PM
Share

अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात ठाकरे गटाच्या बऱ्याच नेत्यांनी प्रवेश केलेला आहे. नुकतेच शिंदे गटाने ऑपरेशन टायगर राबवत ठाकरेंच्या खासदारांना आपल्या पक्षात सामावून घेतले. अधून मधून नव्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असते. दरम्यान, सध्या कोकणात काहीतरी मोठं घडण्याची शक्यात व्यक्त केली जातेय. कोकणातील कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर हे शिवसेनेच्या बैठकीला उसपस्थित राहिल्याने एकच खळबळ उडाली आहे. ते आता शिंदे गटात प्रवेश करतात की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. त्यानंतर खुद्द पारकर यांनीही आपल्या राजकीय भविष्यावर सूचक विधा केलंय.

धाराशीवमध्ये शिवसेना पक्षाची बैठक पार पडली. यावेळी मंत्री उद्यस सामंत, खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होते. या बैठकीला पारकर उपस्थित राहिल्याने उदय सामंत यांनी सूचक विधान केले. त्यांनी काही संकेतही दिले आहेत. संदेश पारकर शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित राहिले. त्यांनी ओपनिंग बॅट्समन म्हणून भाषण केले असेल, तर त्यातूनच सर्वांनी अर्थ समजून घ्यावा, असं सूचक विधान उदय सामंतांनी केलं. सोबतच ऑपरेशन टायगर’बाबत सध्या आम्ही बोलणार नाही, दुष्काळामुळे सध्या त्यावर भाष्य टाळत आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑपरेशन कधी करतात, हे कोणालाही कळत नाही, असंही उदय सामंत बोलून गेले. खासदार ओमराजे निंबाळकर माझ्या बाजूला आहेत. त्यांचे ऑपरेशन कधी झाले, हे देखील कोणाला कळले नाही, असे म्हणत ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशाची उदय सामंत यांनी आठवण करून दिली. त्यामुळे आता कोकणात काहीतरी मोठं घडणार का? याची चर्चा रंगली आहे.

संदेश पारकर शिंदे यांच्या शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित होते. यावरच खुद्द पारकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. महाराष्ट्रातील सर्व नगराध्यक्षांना बोलावलं होतं. त्या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या बैठकीत शहराच्या विकासासंदर्भात चर्चा करण्यात आली. कणकवली शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावं. कणकवली शहराचा विकास झाला पाहिजे ही माझी भूमिका असल्यामुळे सगळ्यात नेत्यांना मी भेटत असतो, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

सोबतच, नगराध्यक्ष झाल्यापासून मी विकासकामांचा धडाका लावलेला आहे.मी कोणताही प्रवेश केला नाही. मी प्रवेश करणार त्यावेळी जाहीरपणे सांगेल. पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली शहरासाठी वीस लाख रुपये निधी दिला. त्यांनी माझी मागणी पूर्ण केली, असं कौतुकही पारकर यांनी केलं. संदेश पारकर प्रत्येकाला हवा आहे. आम्ही जनतेतलं नेतृत्व आहोत. सगळ्यांचं स्वप्न मी पूर्ण करू शकत नाही. शहराच्या विकासासाठी निर्णय कुठेतरी करावा लागेल. त्यावेळी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. भाजप किंवा शिंदे सेनेत प्रवेश करायचा याचा निर्णय योग्य वेळी घेऊषष असंही पारकर यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आगामी काळात काय घडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
देवराम लांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; राज ठाकरेंच्या उल्लेखाने..
देवराम लांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; राज ठाकरेंच्या उल्लेखाने मनसे आक्रमक
पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! भाजप-अकाली दलाची युती, मुख्यमंत्रीपद
पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! भाजप-अकाली दलाची युती, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?
रोहित पवार त्यांच्याच पक्षातच एकटे पडले; प्रताप सरनाईकांचा खोचक टोला
Pratap Sarnaik on Rohit Pawar : रोहित पवार त्यांच्याच पक्षातच एकटे पडले; प्रताप सरनाईकांचा खोचक टोला
ठाकरे गटाचे नेते शिंदेंच्या बैठकीत, उदय सामंतांच्या सूचक विधानाने...
ठाकरे गटाचे नेते शिंदेंच्या बैठकीत, उदय सामंतांच्या सूचक विधानाने चर्चांना उधाण!
आठवडाभरात कांद्याचे दर क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; लासलगावमध्ये...
Onion Price Crash : आठवडाभरात कांद्याचे दर क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; लासलगावमध्ये शेतकऱ्यांची चिंता वाढली
मुंबईत पुस्तकांचा महासोहळा! 650 स्टॉल्सवर लाखो पुस्तके...
मुंबईत पुस्तकांचा महासोहळा! 650 स्टॉल्सवर लाखो पुस्तके, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
मनोज जरांगेंविरोधात तक्रार देण्यासाठी अजय बारस्कर पोलीस ठाण्यात....
Manoj Jarange Case : मनोज जरांगेंविरोधात तक्रार देण्यासाठी अजय बारस्कर पोलीस ठाण्यात; पेन ड्राइव्हमधील पुराव्याने खळबळ
रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार? परिणय फुके यांचा मोठा दावा!
Parinay Fuke : रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार? परिणय फुके यांचा मोठा दावा!
जळगावमध्ये सोनं तोळ्यामागे एवढ्या रुपयांनी महाग; चांदीतही....
Gold Silver Price Today : जळगावमध्ये सोनं तोळ्यामागे एवढ्या रुपयांनी महाग; चांदीतही 2000 रुपयांची वाढ VIDEO बघाच
शरद पवार स्वतःहून NDA मध्ये जातील, असं वाटत नाही-भुजबळ
Chhagan Bhujbal : शरद पवार स्वतःहून NDA मध्ये जातील, असं वाटत नाही-भुजबळ