AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhuri Dixit: आम्ही कधीच त्याचा दिखावा करत नाही..; माधुरीबद्दल काय म्हणाले पती डॉ. श्रीराम नेने?

Madhuri Dixit: नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत डॉ. श्रीराम नेने हे त्यांची पत्नी आणि अभिनेत्री माधुरी दीक्षितविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. डॉ. श्रीराम नेने यांनी माधुरीचं भरभरून कौतुक केलं आहे.

Madhuri Dixit: आम्ही कधीच त्याचा दिखावा करत नाही..; माधुरीबद्दल काय म्हणाले पती डॉ. श्रीराम नेने?
माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेनेImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 24, 2026 | 3:35 PM
Share

Madhuri Dixit: बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित आजही तिच्या अभिनयाने, नृत्याने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करते. मात्र पडद्यावरची लोकप्रियता आणि वैयक्तिक आयुष्यातील साधेपणा यांचा सुंदर समतोल माधुरीने नेहमीच राखला आहे. आता तिचे पती आणि प्रसिद्ध डॉक्टर श्रीराम नेने यांनी माधुरीचं मनापासून कौतुक केलं आहे. माधुरी ही शिस्त आणि सामर्थ्याचं प्रतीक असल्याचं सांगत त्यांनी तिच्या स्वभावातील काही खास गुणांचा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्याची सध्या मनोरंजनविश्वात चर्चा सुरू आहे. डॉ. श्रीराम नेने यांनी नुकतंच ’21 डेज टू गुड हेल्थ’ हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाच्या लेखनावर पत्नी माधुरी आणि मुलांचा प्रभाव असल्याचं त्यांनी सांगितलं. याविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी माधुरीबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं. माधुरी ही शिस्तप्रिय, खंबीर आणि जमिनीवर पाय असलेली व्यक्ती असल्याचं ते म्हणाले.

“माझी पत्नी शिस्त आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे. आम्ही दोघांनीही आपापल्या क्षेत्रात यश मिळवलं आहे; पण आम्ही त्याचा कधीही दिखावा करत नाही. कारण आमचं बालपण आणि जडणघडण संघर्षातून झाली आहे. त्यामुळे आयुष्यातील अर्थपूर्ण गोष्टी, माणसं आणि संवाद यांना आम्ही महत्त्व देतो,” अशा शब्दांत डॉ. नेने यांनी माधुरीचं कौतुक केलं.

पहा फोटो-

माधुरीच्या नम्र स्वभावाचंही केलं कौतुक

माधुरीच्या शिस्तीबरोबरच तिच्या नम्र आणि दयाळू स्वभावाचाही डॉ. नेने यांनी आवर्जून उल्लेख केला. माधुरी पडद्यावर कशी दिसते, मुलाखतींमध्ये कशी बोलते किंवा लोकांशी कशी वागते, यामधून तिच्या व्यक्तिमत्त्वातील मूल्यं दिसून येतात, असं ते म्हणाले. “ती तुम्हाला भेटलेल्या सर्वांत दयाळू आणि नम्र व्यक्तींपैकी एक असेल. ती ज्या पद्धतीने लोकांशी वागते, त्यातून तिच्या स्वभावातील चांगुलपणा दिसतो. तुम्ही इतरांशी जसं वागता, तसंच ते तुमच्याकडे परत येतं,” असंही डॉ. नेने यांनी सांगितलं.

माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांचा विवाह 17 ऑक्टोबर 1999 रोजी अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्निया इथं पारंपरिक पद्धतीने पार पडला होता. माधुरी त्यावेळी तिच्या करिअरच्या शिखरावर होती. त्यामुळे तिच्या लग्नाची बातमी अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का होती. लग्नानंतर माधुरी अमेरिकेत स्थायिक झाली आणि दोघांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली.

Follow Us
देवराम लांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; राज ठाकरेंच्या उल्लेखाने..
देवराम लांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; राज ठाकरेंच्या उल्लेखाने मनसे आक्रमक
पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! भाजप-अकाली दलाची युती, मुख्यमंत्रीपद
पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! भाजप-अकाली दलाची युती, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?
रोहित पवार त्यांच्याच पक्षातच एकटे पडले; प्रताप सरनाईकांचा खोचक टोला
Pratap Sarnaik on Rohit Pawar : रोहित पवार त्यांच्याच पक्षातच एकटे पडले; प्रताप सरनाईकांचा खोचक टोला
ठाकरे गटाचे नेते शिंदेंच्या बैठकीत, उदय सामंतांच्या सूचक विधानाने...
ठाकरे गटाचे नेते शिंदेंच्या बैठकीत, उदय सामंतांच्या सूचक विधानाने चर्चांना उधाण!
आठवडाभरात कांद्याचे दर क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; लासलगावमध्ये...
Onion Price Crash : आठवडाभरात कांद्याचे दर क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; लासलगावमध्ये शेतकऱ्यांची चिंता वाढली
मुंबईत पुस्तकांचा महासोहळा! 650 स्टॉल्सवर लाखो पुस्तके...
मुंबईत पुस्तकांचा महासोहळा! 650 स्टॉल्सवर लाखो पुस्तके, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
मनोज जरांगेंविरोधात तक्रार देण्यासाठी अजय बारस्कर पोलीस ठाण्यात....
Manoj Jarange Case : मनोज जरांगेंविरोधात तक्रार देण्यासाठी अजय बारस्कर पोलीस ठाण्यात; पेन ड्राइव्हमधील पुराव्याने खळबळ
रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार? परिणय फुके यांचा मोठा दावा!
Parinay Fuke : रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार? परिणय फुके यांचा मोठा दावा!
जळगावमध्ये सोनं तोळ्यामागे एवढ्या रुपयांनी महाग; चांदीतही....
Gold Silver Price Today : जळगावमध्ये सोनं तोळ्यामागे एवढ्या रुपयांनी महाग; चांदीतही 2000 रुपयांची वाढ VIDEO बघाच
शरद पवार स्वतःहून NDA मध्ये जातील, असं वाटत नाही-भुजबळ
Chhagan Bhujbal : शरद पवार स्वतःहून NDA मध्ये जातील, असं वाटत नाही-भुजबळ