Dharmendra : दोन लग्न होऊनही 27 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत होतं धर्मेंद्र यांचं अफेअर; हेमा मालिनींनी दिलेली सक्त ताकीद, काय घडलेलं?
Dharmendra Affair With Actress : धर्मेंद्र यांचं नाव बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत जोडलं गेलेलं. त्यावेळी धर्मेंद्र आधीच विवाहित होते. त्यामुळे, हेमा मालिनी यांनीही अभिनेत्याला ताकीद दिलेली.

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं वैयक्तिक आयुष्य कायमच चर्चेचा विषय राहिलं आहे. त्यांच्या अभिनयाइतकीच त्यांच्या अफेअर्सचीही चर्चा झाली. पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्याशी लग्न झालेलं असतानाच धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं. मात्र, दुसऱ्या लग्नानंतरही त्यांचं नाव एका लोकप्रिय अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं होतं. ही अभिनेत्री म्हणजे अनिता राज. धर्मेंद्र यांच्यापेक्षा तब्बल 27 वर्षांनी लहान असलेल्या अनिता राजसोबत त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.
धर्मेंद्र आणि अनिता राज यांच्या अफेअरच्या चर्चा
1980 च्या दशकात धर्मेंद्र आणि अनिता राज यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. पडद्यावर या दोघांची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडली. 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नौकर बीवी का’ या चित्रपटात त्यांनी एकत्र भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात धर्मेंद्र यांनी दीपक कुमार, तर अनिता राज यांनी ज्योती ही व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटात रीना रॉय यांचीही महत्त्वाची भूमिका होती. या चित्रपटांमधील एकत्र कामामुळे दोघांमध्ये जवळीक निर्माण झाल्याच्या चर्चा त्यावेळी सुरू झाल्या होत्या. धर्मेंद्र विवाहित असूनही अनिता राज यांच्या प्रेमात पडल्याचं काही वृत्तांमध्ये म्हटलं गेलं होतं. दोघांच्या वयात 27 वर्षांचं अंतर असल्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं होतं.
हेमा मालिनी यांनी दिलेली होती ताकीद?
धर्मेंद्र आणि अनिता राज यांच्या वाढत्या जवळिकीच्या बातम्या हेमा मालिनी यांच्या कानावर गेल्याचं सांगितलं जातं. या चर्चांमुळे हेमा मालिनी नाराज झाल्या होत्या. त्यांनी धर्मेंद्र यांना अनिता राज यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिलेला.
View this post on Instagram
अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं
धर्मेंद्र आणि अनिता राज यांनी जवळपास 10 वर्षे अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. ‘गुलामी’, ‘जीने नहीं दूंगा’ आणि ‘हम से ना टकराना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांची जोडी पाहायला मिळाली. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. दरम्यान, धर्मेंद्र यांचं 24 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झालं.
